औरंगाबाद | कोरोना महामारी चा प्रादुर्भाव सर्व देशभर दिसत आहे. आता कोरोना महामारी ची दुसरी लाट ओसरत असताना म्युकरमायकोसिसचे संकट अजूनही आहे. म्युकरमायकोसिसने 40 रुग्णांचा बळी घेतला आहे.
म्युकरमायकोसिसचे दररोज चार ते पाच रुग्ण आढळून येतात. गेल्या दीड महिन्याचा म्युकरमायकोसिसचा अहवाल पाहता आतापर्यंत 41 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता कोरोनाच्या रुग्णांची संख्या दहाच्या आत आली असली तरीही म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढतच आहेत.
हाती आलेल्या माहितीनुसार शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये म्युकरमायकोसिसचे दररोज चार ते पाच नवीन रुग्ण दाखल होतात. 15 जून ते 31 जुलाई या कालावधीमध्ये शहरात म्युकरमायकोसिसचे 41 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या 115 वर गेली असून 37 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण संख्या 1231 झाली आहे.