औरंगाबाद | कोरोनामुळे नियमांचे पालन करून ऑनलाइन पद्धतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे कामकाज सुरू होते. त्यातही केवळ तातडीच्या प्रकरणावर सुनावणी होत होती. मात्र आता मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रबंधकांनी काढलेल्या आदेशानुसार औरंगाबाद खंडपीठ आज सोमवार दिनांक दोन ऑगस्ट पासून प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे.
सकाळी साडेदहा ते दिड व दुपारी अडीच ते साडेचार या वेळेत सुनावणी सुरू असणार आहे. 5 सप्टेंबरपर्यंत खंडपीठाच्या न्यायमूर्तींचे सुनावणीच्या संदर्भाने वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयीन कामकाजात शारीरिक अंतर राखण्याच्या नियमांचे पालन केले जात होते. मात्र ऑनलाईन पद्धतीने प्रकरणावरील सुनावणीच्या कामकाजाची प्रक्रिया सुरू होती. न्यायमूर्तींसह वकीलही ऑनलाइन पद्धतीच्या कामकाजात सहभाग घेत होते.