Wednesday, October 5, 2022

Buy now

कुमठे येथील आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्याला मारहाण

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

कुमठे (ता. सातारा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्याला गावातीलच गावगुंड मनोज वाघमारे उर्फ सोन्या याने मारहाण केली. या मारहाणीच्या निषेधार्थ आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. यावेळी घटनास्थळी बोरगाव पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी यादव यांनी भेट देऊन संबंधित गावगुंडावर कारवाई करण्याच्या सुचना देत आरोग्य कर्मचाऱ्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.

आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केल्याने काही काळ रूग्णांची गैरसोय झाली. यावेळी बोरगाव पोलिसांनी कर्मचाऱ्यांना अश्वासन देवून सबंधिताविरूध्द तक्रार घेण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन माघारी घेण्यात आले. त्यानंतर गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

यापूर्वीही अशा प्रकारे कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला होता, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संबधितांवर कारवाईची मागणी केली. त्याशिवाय आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला होता.