औरंगाबाद | सध्या कोरोनाच्या पार्शवभूमीवर एकंदरीत सगळेच व्यवसाय बंद आहेत त्याच ठिकाणी पार्लर व्यवसाय ही बंद आहे. आमच्याकडे शासनाने दुर्लक्ष करून चालणार नाही तर आमच्याविषयी ही विचार करावा तसेच पार्लर चालवणारे व्यवसायिक कर्मचारी यांचाही योग्य तो विचार करून अनुदान देण्यात यावे अशी मागणी ब्युटी पार्लर चाक महिलांनी हॅलो महाराष्ट्र सोबत बोलताना केली.
आम्ही हे व्यवसाय कर्जबाजारी होऊन सुरु केले आहेत त्यामध्ये कर्मचाऱ्यांना कुठून पगारी कराव्यात हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
तसेच पार्लर व्यवसाय हा एक पोट भरण्याचा आधार आहे. पण तोच बंद असेल तर कुणाकडे मागणी करावी असेही प्रश्न मांडण्यात आले. घरखर्च , जागेचे भाडे, मेकअपच्या सामानाचा खर्च, कुठून दयावा.यामुळे कदाचित आत्महत्येचे पाऊल उचलू अशी प्रतिक्रिया ब्युटी पार्लर चालक महिलांने दिली
कोरोना मुळे अनेक व्यावसायिक हतबल झाले आहे अश्यातच व्यावसायिकांनी उदरनिर्वाह करावा कसा हा प्रश्न अनेक व्यासायिकांच्या समोर आहे.