BECIL Recruitment 2023 | पदवीधरांना मीडियामध्ये नोकरी करण्याची संधी, ‘या’ ठिकाणी करा अर्ज

BECIL Recruitment 2023
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

BECIL Recruitment 2023 | तुमचे ग्रॅज्युएशन झाले असेल आणि सध्या तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल, तर आजचा हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. कारण आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक नोकरीची भन्नाट संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड म्हणजेच बेसिलमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे.

याबाबत त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर नोटिफिकेशन देखील जाहीर करण्यात आलेले आहे. आता या पदासाठी कोणते शैक्षणिक पात्रता लागते? वयोमर्यादा काय असणार आहे? त्याचप्रमाणे पगार काय असणार आहे ? याची सविस्तर माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत.

बेसिलमध्ये मॉनिटर पदाची भरती केली जाणार आहे. तुम्हाला जर या पदासाठी अर्ज करायचा असेल, तर उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून किंवा शिक्षण संस्थेतून ग्रॅज्युएशन पूर्ण करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे त्या विद्यार्थ्याला भाषेचे आणि कम्प्युटरचे ज्ञान असणे गरजेचे आहे. तसेच उमेदवारांना मीडिया आणि वृत्त क्षेत्रात एक वर्षाचा अनुभव असणे खूप गरजेचे आहे.

अर्ज शुल्क | BECIL Recruitment 2023

बेसिक भरतीसाठी अर्ज करण्यासाठी जनरल, ओबीसी, माजी सैनिकांनी महिला प्रवर्गातील उमेदवारांना 885 रुपये शुल्क आहे. त्याचप्रमाणे SC, ST, EWS, आणि PH उमेदवारांना केवळ 531 रुपये एवढे शुल्क आहे.

अर्ज कसा करायचा

  • ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडियन लिमिटेडमधील अर्ज करण्यासाठी सगळ्यात आधी उमेदवारांना त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • त्यानंतर तिथे गेल्यावर तुम्हाला करिअर हा ऑप्शन दिसेल त्या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर आता नोंदणी फॉर्म म्हणजेच ऑनलाइन अर्जावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला तिथे संपूर्ण माहिती भरायची आहे.
  • त्यानंतर त्यांनी सांगितलेली सगळी कागदपत्र तुम्हाला अपलोड करायची आहे.
  • त्यानंतर शेवटी तुम्हाला अर्ज शुल्क भरायचे आहे आणि तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
  • त्यानंतर शेवटी तुमच्या भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची एक प्रिंट घ्या.