परळी प्रतिनिधी | अंबाजोगाईसह बीड जिल्ह्यात दिवसागणिक कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. त्यासोबतच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. सोमवारी अवघ्या एका दिवसात बीड जिल्ह्यातील तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत १७ व्यक्तींचा बळी घेतला आहे.गेवराई शहरातील फुलेनगर, माळीगल्ली या भागात राहणाऱ्या ३२ वर्षीय महिलेला गंभीर अवस्थेत १८ जुलै रोजी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. आज सोमवारी दुपारी या महिलेचा मृत्यू झाला. परळी तालुक्यातील सिरसाळा येथील शिक्षकाला कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर आधी अंबाजोगाईत आणि नंतर औरंगाबादेत उपचार करण्यात सुरु होते. त्यांचा आज दुपारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर, सायंकाळी बीड शहरातील बार्शी नाका येथील कोरोनाग्रस्त वृद्ध महिलेचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच आता बाधित रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण सुद्धा वाढू लागले आहे.
अंबाजोगाई येथे कोरोना बाधितांची संख्या वाढतच चालली आहे,कालच्या रिपोर्ट मध्ये तब्बल 24 पॉझिटिव्ह आढळून आले होते आजही-26 पॉझिटिव्ह आढळले आहेत,बीड जिल्ह्यात कोरोनाचा आकडा 354 पार होत आहे.बाधित रुग्णांचा आकडा 354 च्या वर जाऊन पोहोचली आहे त्यापैकी 174 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर जिल्ह्यात आत्तापर्यंत 17 जणांचा मृत्यू झालेला आहे सध्या उपचार घेत असलेले रुग्ण 142 आहेत
ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहे तो भाग कंटेनमेंट झोन घोषित करून सील करण्यात येत आहे नागरिकांनी आता याचे गांभिर्य लक्षात घ्यायला हवे कोरोनाचे संक्रमण आता मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहे रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांनाच आता कोरोनाची लागण होत असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे आज पाठवण्यात आलेल्या अहवालामध्ये देखील 26- पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.