बीड प्रतिनिधी । बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या कामचुकारपणामुळे दोन हजार शिक्षकांचे वेतनवाढीचे प्रस्ताव विभागाकडे गेले कित्येक महिने पडून आहेत. त्यामुळे दोन हजार शिक्षकांची वेतनवाढ केवळ शिक्षण विभागातील अधिकार्यांच्या हलगर्जीपणामुळं रखडल्याची माहिती उघडकीस आली आहे. यामुळे शिक्षकाकडून संताप व्यक्त केला जात असून वेतनश्रेणी वाढ यादी तात्काळ जाहीर करावी, अशी मागणी ते करत आहेत.
सहा ते बारा वर्षाने वरिष्ठ वेतनश्रेणी वाढ होत असते. त्यानुसार प्रस्ताव दाखल केले जात असतात. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात शिक्षकांनी वेतनश्रेणी वाढ प्रस्ताव दाखल केले आहेत आणि तेथील जिल्हा परिषद शिक्षण विभागाने निकालीही काढले परंतु बीड जिल्ह्यातील शिक्षण विभाग जेष्ठ वेतनश्रेणी वाढ प्रस्तावावर दुर्लक्ष करत आहे.
जिल्ह्यातून जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसह संस्थेच्या तब्बल दोन हजार शिक्षकांनी वरिष्ठ वेतनश्रेणी वाढ प्रस्ताव शिक्षण विभागाकडे गेल्या अनेक दिवसांपासून दाखल केले आहेत. या प्रस्तावावर शिक्षण विभागातील अधिकार्यांनी काम करून त्याची यादी जाहीर करावी लागते, परंतु हे काम करताना आपला कुठलाच फायदा होणार नाही हे लक्षात आल्यामुळे या दोन हजार प्रस्तावांकडे शिक्षण विभाग दुर्लक्ष करत आहे. त्यामळे दोन हजार शिक्षकांची वेतनवाढ अद्यापही रखडली आहे.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.




