फक्त रणवीरच नाही… तर ‘या’ स्टार्सनी देखील NUDE photoshoot करून माजवली होती खळबळ !!!

NUDE photoshoot
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । NUDE photoshoot : आपल्या न्यूड फोटोशूटमुळे अभिनेता रणवीर सिंग चांगलाच अडचणीत सापडला आहे. मुंबईतील चेंबूरमधील एका एनजीओने त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे. रणवीरविरोधात फक्त मुंबईतच नाही तर इंदूरमध्येही तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र हे जाणून घ्या कि, अशा प्रकारचे न्यूड फोटोशूट करणारा रणवीर सिंग हा काही पहिलाच अभिनेता नाही. याआधीही मिलिंद सोमणपासून ते जॉन अब्राहमपर्यंत अनेक स्टार्सनी न्यूड फोटोशूट केले आहेत.

Ranveer Singh lands into legal trouble for nude photoshoot; Police  complaint filed against him for 'hurting women's sentiments' | Hindi Movie  News - Times of India

या न्यूड फोटोमुळे सोशल मीडियावर रणवीर सिंगला चांगलेच ट्रोल केले जात आहे. मात्र रणवीरच्या आधी ज्या बॉलिवूड स्टार्सने न्यूड फोटोशूट (NUDE photoshoot) केले होते त्यांच्यावरही त्यावेळी टीका करण्यात आलेली होती. रणवीर सिंगने एका पेपर मॅगझिनसाठी हे फोटोशूट केले आहे. या फोटोमध्ये तो अनेक प्रकारच्या पोझ देताना दिसून येतो. आशिष शाह यांनी हे फोटोशूट (NUDE photoshoot) केले आहे. मात्र, एकीकडे त्याच्यावर टीका होत असताना काहीजण त्याचे कौतुकही करत आहेत.

रणवीर की न्यूड फोटो से भी खतरनाक है मिलिंद सोमन की ये बोल्ड तस्वीरें -  These bold pictures of Milind Soman are more dangerous than Ranveers nude  photos | Dailynews

90 च्या दशकातही मिलिंद सोमण हा अभिनेता न्यूड फोटोशूट (NUDE photoshoot) करून प्रचंड चर्चेत आला होता. याच्या काही काळा नंतर त्याने गोवा बीचवर न्यूड होऊन धावतानाचा फोटो शेअर केला होता, ज्यावरून त्यावेळी प्रचंड गोंगदारोळ माजला होता. त्यावेळी मिलिंद सोमण विरोधात TabIT कायद्यांतर्गत IPC च्या कलम 294 (अश्लील कृत्ये आणि गाणी) आणि कलम 67 (इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील साहित्य प्रकाशित करणे किंवा प्रसारित करणे) अंतर्गत गुन्हा देखील दाखल केला गेला होता.

John Abraham to Milind Soman, a list of celebs who went nude for photoshoot

न्यूड फोटोशूट (NUDE photoshoot) करणाऱ्या अभिनेत्यांच्या लिस्ट मध्ये जॉन अब्राहमचे नाव देखील सामील आहे. जॉनने 2021 मध्ये आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक न्यूड फोटो शेअर केला होता. आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये त्याने हा फोटो क्लिक केला होता. यावेळी जॉनने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, ‘मी वॉर्डरोबची वाट पाहत आहे.’ मात्र, या फोटोमध्ये जॉनने स्वत:ला अगदी शिताफीने कुशनने झाकल्याचे दिसून आले.

Rahul Khanna bares it all for this photo; says, he wants to share something  that he has been 'keeping under wraps' : Bollywood News - Bollywood Hungama

दिग्गज बॉलीवूड अभिनेता विनोद खन्ना यांचा धाकटा मुलगा असलेल्या राहुल खन्ना यानेही इंस्टाग्रामवरवर एक न्यूड फोटो (NUDE photoshoot) शेअर करून खळबळ उडवून दिली होती. त्याया फोटोमध्ये राहुल सोफ्यावर बसलेला दिसून येतो. यावेळी त्याने आपला फक्त प्रायव्हेट पार्ट कुशनने झाकलेला आहे. यावेळी त्याने पायात मोजे आणि लेदर शुज घालून लोकांना चकितच केले.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.instagram.com/ranveersingh/?hl=en

हे पण वाचा :

FD Rates : आता ‘ही’ स्मॉल फायनान्स बँक FD वर देणार जास्त व्याज, नवीन दर तपासा

BSNL चे पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडून 1.64 लाख कोटी रुपयांचे पॅकेज मंजुर

Multibagger Stock : 5 वर्षात 1460% रिटर्न देणाऱ्या ‘या’ शेअर्समध्ये गुंतवणूक करून मिळवा भरपूर पैसे !!!

Bank Holiday : ऑगस्टमध्ये बँका 17 दिवस राहणार बंद, बँकेच्या सुट्ट्यांची लिस्ट तपासा

FD Rates : SBI की पोस्ट ऑफिस यापैकी कोणत्या FD वर चांगला रिटर्न मिळेल ते पहा !!!