रामनवमी उत्सवाला गालबोट; मंदिरातील विहिरीचे छत कोसळून दुर्घटना, 25 हुन अधिक अडकले

beleshwar mahadev temple well roof collapsed
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज रामनवमी निमित्त संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण असून ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात रामनवमी साजरी केली जात आहे. मात्र मध्य प्रदेशात या उत्साहाला गालबोट लागल आहे. इंदोर मधील श्री बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिराच्या आवारात बांधलेल्या विहिरीवरील छत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या विहीरीत 25 हून अधिक भाविक पडले असून त्यांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. रामनवमीच्या दिवशीच घडलेल्या या दुर्घटनेमुळे इंदौरमध्ये खळबळ उडाली आहे.

बेलेश्वर मंदिरात ही विहीर खूप आधीपासून आहे. त्यावर दहा वर्षांपूर्वी छत टाकण्यात आलं होतं. पूजेच्या वेळी जेव्हा 20 ते 25 लोक विहिरीच्या छतावर उभे होते, तेव्हा अचानक हे छत कोसळल्याने त्यावर उभे असलेले भाविक विहिरीत पडले. या भाविकांना बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदतकार्य सुरु आहे. ही विहीर सुमारे 50 फूट खोल असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या घटनेची दखल घेतली आहे. इंदूरचे जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना फोन करुन बचाव कार्याला गती देण्याच्या सूचना शिवराज सिंह चौहान यांनी केल्या आहेत.तसेच मुख्यमंत्री कार्यालय इंदूर जिल्हा प्रशासनाच्या सतत्याने संपर्कात आहे.