व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

माणूस अमर होणार? शास्त्रज्ञाच्या भविष्याने संपूर्ण जग हैराण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आत्तापर्यंत तुम्ही हेच ऐकलं असेल कि मृत्यू अटळ आहे. जो जन्माला येतो त्याचा मृत्यू कधी ना कधी ठरलेला असतो. कधी ना जधी प्रत्येकाला मरण हे येणारच आहे. मात्र मनुष्य लवकरच अमर होऊ शकतो असा दावा करून एका शास्त्रज्ञाने हैराण करून सोडलं आहे. रे कुर्झवील (ReRay Kurzweil) असं या शास्त्रज्ञाचे नाव असून एक भविष्यवादी आणि संगणक शास्त्रज्ञ म्हणून जगभरात ते चांगलेच प्रसिद्ध आहेत. त्यांनी यापूर्वी केलेली अनेक भाकीते खरी ठरली आहेत असेही बोलले जात आहे.

अवघ्या सात वर्षांत माणूस अमर होईल, अशी धक्कादायक भविष्यवाणी रे कुर्झवील यांनी केली आहे. नॅनोबॉट्स’च्या मदतीने 2031 पर्यंत मानवाला अमरत्व प्राप्त होईल. कुर्झविल यांनी चॅनेल अडागिओद्वारे पोस्ट केलेल्या YouTube व्हिडिओमध्ये हा दावा केला आहे. यावेळी त्यांनी आनुवंशिकी, नॅनोटेक्नॉलॉजी, रोबोटिक्स यावर भाष्य केलं आहे. मानव कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मध्ये प्रभुत्व मिळवण्याच्या मार्गावर आहेत आणि जेव्हा हे पूर्णपणे साध्य होईल, तेव्हा लोकांना यापुढे त्यांच्या भौतिक शरीरात राहण्याची गरज लागणार नाही. 2030 पर्यंत हा पराक्रम शक्य होईल, असा दावा कुर्झवील यांनी केला आहे. त्यांनी पुढे सांगितलं, मी ‘सिंग्युलॅरिटी’ साठी 2045 ही तारीख निश्चित केली आहे, जेव्हा आपण तयार केलेल्या बुद्धिमत्तेमध्ये विलीन होऊन आपण आपली प्रभावी बुद्धिमत्ता अब्जावधी पटीने वाढवू.

दरम्यान, कुर्झविल यांनी भाकीत करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी सुद्धा त्यांनी अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या. 1990 मध्ये, कुर्झवीलने भाकीत केले होते की 2000 पर्यंत जगातील सर्वोत्कृष्ट बुद्धिबळपटू संगणकासमोर पराभूत होईल. 1997 मध्ये दीप ब्लूने गॅरी कास्पारोव्हला हरवले तेव्हा हे भाकीत खरे ठरले. त्यानंतर नंतर 1999 मध्ये, त्यांनी आणखी एक भविष्यवाणी केली की 2023 पर्यंत, 1,000 डॉलर रुपयांच्या लॅपटॉपमध्ये मानवी मेंदूची साठवण क्षमता असेल. आता तर त्यांनी थेट माणसाच्या अमर होण्याबाबतच भविष्यवाणी केली आहे. तुम्हाला यावर काय वाटत ते आम्हांला सांगा.