बेल्जियम : एकाचवेळी कोरोनाच्या चक्क दोन व्हेरिएंट्सचा संसर्ग झालेल्या वृद्ध महिलेचा 5 दिवसात झाला मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ब्रुसेल्स । बेल्जियममधील कोरोनाव्हायरसच्या एका प्रकरणामुळे जगभरातील वैज्ञानिक आणि डॉक्टर आश्चर्यचकित झाले आहेत. वास्तविक, ब्रसेल्समध्ये राहणाऱ्या एका 90-वर्षीय महिलेमध्ये एकाच वेळी कोविडची दोन भिन्न व्हेरिएंट्स (Two Variants of Covid) आढळले. हळू हळू तिची प्रकृती खालावली आणि अवघ्या पाच दिवसांतच तिचा मृत्यू झाला.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या भीतीमुळे सध्या या विषाणूचा डेल्टा व्हेरिएंट अनेक देशांमध्ये त्रास देत आहे. या प्रकारची दुर्मीळ घटना समोर आल्यानंतर आरोग्य तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, यामुळे व्हायरसविरूद्धचा लढा पूर्वीपेक्षा अधिक कठीण होऊ शकतो.

संपूर्ण प्रकरण काय आहे?
मीडिया रिपोर्टनुसार या महिलेने कोरोना लस घेतलेली नाही. ती घरात एकटीच राहत होती. मार्चमध्ये महिलेची तब्येत अचानक बिघडली, त्यानंतर तिला ब्रुसेल्सच्या आलस्ट शहरातील ओएलव्ही रुग्णालयात दाखल केले. चाचणी केल्यानंतर त्या महिलेचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर हळूहळू तिची तब्येत बिघडत गेली आणि तिचा मृत्यू झाला.

ओएलव्ही हॉस्पिटलमधील मॉलेक्यूलर बायोलॉजिस्ट आणि संशोधन पथकाच्या प्रमुख अ‍ॅनी वेंकियर्बर्गेन म्हणाल्या, “त्यावेळी हे दोन्ही व्हेरिएंट बेल्जियममध्ये वेगाने पसरत होते, म्हणून कदाचित त्या महिलेला दोन लोकांकडून भिन्न व्हेरिएंट्स मिळाले असतील. मात्र तिला संसर्ग कसा झाला हे माहित नाही. या दोहोंच्या संसर्गामुळे किंवा इतर काही कारणांमुळे त्या महिलेची प्रकृती लवकर बिघडली आहे की नाही हे सांगणे आता अवघड आहे असेही संशोधन पथकाचे प्रमुख म्हणाले. सध्या त्याचा तपास सुरू आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment