कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
रहेबर-ए-जरिया सोशल फौंडेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या तिसर्या वर्धापनदिनानिमित्त मोफत आरोग्य शिबीर व कोविड योद्धांचा सत्कार समारंभ करण्यात आला. यावेळी 250 पेक्षा जास्त लोकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. शिबिराचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी मोटर वाहन निरीक्षक चैतन्य कणसे, अर्जुन लांडगे, पाडळीच्या सरपंच आशामा मुजावर, मातोश्री ग्रुपचे अध्यक्ष नवाज सुतार, जावेदभाई नायकवडी, साबीरभाई मुल्ला, अल्ताफ सवार, मन्सूर बागवान, सलीम मुजावर, महंमदअल्ली शेख, अनिल कदम, आनंदा कळके, हाशम मुजावर, आनंदा बडेकर, नयूम शेख, राहुल पुजारी, शफीक मुजावर, पोलीस पाटील सर्फराज शेख, विश्वास मोहिते, तोफिक आगा, साबीर मुल्ला, रहेबर संस्थेचे अध्यक्ष वसीम शेख, गावातील जिल्हा परिषद शाळेचा स्टाफ, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, पुणे डॉक्टर टीम, बालवीर गणेश मंडळाचे पदाधिकारी, रहेबर फौंडेशनचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
अॅड. उदयसिंह पाटील म्हणाले, कोरोनामुळे लोकांना आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे लक्षात आले आहे. आरोग्य ही आपली संपत्ती आहे. आज पैसे नसल्याने लोकांना उपचार मिळत नाहीत, त्यामुळे रहेबर- ए- जरिया सोशल फाैंडेशने आयोजित केलेले आरोग्य शिबिर काैतुकास्पद आहे. विश्वास मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक महंमदअल्ली शेख व आभार असिफ नदाफ यांनी केले.