Benefits Of Dry Fruits | ड्राय फ्रुट्स म्हणजे सुका मेवा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अनेक डॉक्टर देखील सुकामेवा खाण्याचे सल्ला देत असतात. बदाम खाल्ल्याने आपला मेंदू तीक्ष्ण होतो. कारण बदामामध्ये विटामिन ई मुबलक प्रमाणात असतात. त्याचप्रमाणे ड्रायफ्रूट्सने आपले मानसिक आरोग्य देखील सुधारते. त्यामुळे अल्झायरम सारख्या आजारांचा धोका देखील कमी होतो. ड्रायफ्रूट्समध्ये काजू, बदाम, पिस्ता, मनुका, अक्रोड यांसारखे विविध पदार्थ असतात. ज्यामुळे आपल्या शरीराला अनेक पोषक घटक मिळतात. त्याचे अनेक फायदे देखील असतात. सुक्या मेव्याचे आपल्या मेंदूला खूप फायदे असतात (Benefits Of Dry Fruits). आता हे नक्की कोणते फायदे आहेत? हे आपण जाणून घेणार आहोत.
फायबर आणि निरोगी चरबी | Benefits Of Dry Fruits
पिस्ता आणि काजू हे फायबर आणि निरोगी चरबीचा चांगला स्रोत आहेत. हे रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते आणि मेंदूला ऊर्जा प्रदान करते.
प्रथिने
अक्रोड आणि बदामामध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. हे ड्राय फ्रूट्स न्यूरोट्रांसमीटर तयार करण्यास मदत करतात. मेंदूला माहिती पाठवण्यात न्यूरोट्रांसमीटर महत्त्वाची भूमिका बजावतात.
मॅग्नेशियम
काजूमध्ये मॅग्नेशियम जास्त प्रमाणात आढळते, जे तणाव कमी करण्यास मदत करते. याशिवाय डिप्रेशनसारख्या समस्यांवरही हे ड्रायफ्रूट फायदेशीर आहे.
रक्त प्रवाह
पिस्त्यामध्ये असलेले नायट्रिक ऑक्साईड रक्तवाहिन्या उघडते आणि मेंदूला चांगला रक्तपुरवठा करण्यास मदत करते. यामुळे तुमच्या मेंदूचे कार्य सुधारते. तसेच हे ड्रायफ्रूट खाल्ल्याने स्मरणशक्ती मजबूत होते.
अँटिऑक्सिडंट्स | Benefits Of Dry Fruits
अक्रोड, बदाम आणि पिस्ता यांसारख्या ड्रायफ्रूट्समध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात. जसे की व्हिटॅमिन ई आणि पॉलिफेनॉल. हे मेंदूच्या पेशींना मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवतात आणि वयानुसार होणारे आजार कमी करण्यास मदत करतात.
ओमेगा -3 फॅटी ऍसिड
अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड आढळते. हे मेंदूच्या विकासात आणि कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. म्हणून, वाढत्या मुलांना अक्रोड खायलाच पाहिजे, त्यांच्या वाढीसाठी ते खूप महत्वाचे आहे.