हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Benefits Of Eating Walnuts) उन्हाळा असो पावसाळा असो किंवा मग हिवाळा. ऋतू कोणताही असला तरीही सुका मेवा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे तज्ञ सांगतात. कारण आपल्या शरीराला दैनंदिन स्वरूपात जे पोषण गरजेचे असते ते देण्याची क्षमता सुक्या मेव्यात असते. त्यामुळे दररोज काही ठराविक प्रमाणात सुका मेवा जरूर खावा, असे म्हटले जाते. त्यातही अक्रोड खाल्ल्याने अनेक शारीरिक तसेच मानसिक आरोग्यास फायदे मिळतात. खास करून भिजवलेले अक्रोड उन्हाळ्याच्या दिवसात अत्यंत चांगले मानले जाते. चला तर जाणून घेऊ भिजवलेले अक्रोड खाण्याचे फायदे आणि मर्यादा .
अक्रोडमधील पोषक तत्त्वे (Benefits Of Eating Walnuts)
सुका मेव्यातील अक्रोड खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अक्रोड खाणे अत्यंत लाभदायी असल्याचे, तज्ञ सांगतात. कारण, अक्रोड खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. यामध्ये आढळणारे ओमेगा – ३ फॅटी ॲसिड हृदयाला निरोगी बनवते. शिवाय अक्रोड खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण आणि सक्रिय होतो. त्यातही उन्हाळ्याच्या दिवसात अक्रोड पाण्यात भिजवून खाल्ल्याने ते अधिक पौष्टिक होते.
अक्रोडमध्ये व्हिटॅमिन इ, पॉलिफेनॉल्स यांशिवाय अल्फा-लिनोलेनिक ऍसिडचे (एएलए) चांगले प्रमाण असते. (Benefits Of Eating Walnuts) शिवाय यातील दाहक- विरोधी संयुगे हृदयरोगाचा धोका कमी करतात. इतकेच नव्हे तर अक्रोडमध्ये लोह, फॉस्फरस, तांबे, प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सेलेनियम यांसारख्या पोषक तत्वांचादेखील समावेश असतो.
एका दिवसात किती अक्रोड खाता येईल?
नियमित स्वरूपात अक्रोडचे सेवन करणे नक्कीच लाभदायी आहे. त्यामुळे तुम्ही दररोज २ ते ३ अक्रोड बिनधास्त खाऊ शकता. तसेच लहान मुलांना मात्र नियमित स्वरूपात फक्त एक अक्रोड द्या. कारण लहान मुलांनी जास्त अक्रोड खाल्ल्याने काही समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.
उन्हाळ्यात भिजवलेले अक्रोड अधिक फायदेशीर
उन्हाळ्याच्या दिवसात वाढत्या तापमानासोबत आपल्या शरीराचे देखील तापमान चांगलेच वाढलेले असते. त्यामुळे अशा दिवसात सुका मेवा खाताना विशेष करून अक्रोडखावे. तेही भिजवलेले. (Benefits Of Eating Walnuts) भिजवलेल्या अक्रोडमध्ये उष्णता दूर होऊन पौष्टिक घटक वाढतात. यासाठी अक्रोड रात्रभर स्वच्छ पाण्यात भिजवून ठेवून सकाळी खावे. यामुळे शरीराला उष्णतेच्या त्रासापासून आराम मिळू शकतो. मात्र इतर कोणत्याही ऋतूत तुम्ही अक्रोड न भिजवता खाल्ले तरीही चालतील.
अक्रोड खाण्याचे फायदे
- रोज अक्रोड खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो.
- स्मरणशक्ती वाढते.
- यातील अँटी-ऑक्सिडंट्स हृदयासाठीही फायदेशीर ठरतात.
- ताण- तणाव दूर होऊन मानसिक आरोग्य सुधारते. (Benefits Of Eating Walnuts)
- अनिद्रेचा त्रास दूर होऊन झोप सुधारण्यास मदत होते.
- रक्तदाब नियंत्रित राहतो.
- शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते.