Benefits of Jamun | साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यापासून ते हिमोग्लोबिन वाढवण्यापर्यंत, ‘हे’ आहेत जांभळाचे जबरदस्त फायदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |Benefits of Jamun नुकताच उन्हाळा सुरू झालेला आहे. या उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला ठेवणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे उन्हाळ्यात जास्तीत जास्त ताजी फळे, हिरव्या भाज्या खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. आज आपण जांभूळ (Benefits of Jamun) खाण्याचे नक्की काय फायदे असतात. हे जाणून घेणार आहोत. जांभळामध्ये मुबलक प्रमाणात लोह, फायबर, कॅल्शियम, विटामिन सी, मॅग्नेशियम सारखे भरपूर प्रमाणात असतात. जांभूळ चवीने किंचित आंबट आणि तुरट असते.परंतु त्याच्या सेवनाने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. आता या जांभळाचे शरीराला होणारे फायदे जाणून घेऊयात.

साखरेची पातळी नियंत्रित राहते | Benefits of Jamun

जांभळाच्या सेवनाने मधुमेहाच्या रुग्णांना खूप फायदा होतो. यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स असल्याने ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी मदत करते. त्यामुळे जर तुम्ही उन्हाळ्यात जांभळाच्या सेवन केले, तर तुमच्या शरीरातील पाण्याची कमतरता देखील भरून निघेल.

डीहायड्रेशन दूर करते

उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला डिहायड्रेट होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. या दिवसांमध्ये जास्तीत जास्त घाम येतो. तसेच हवामान गरम असते आणि आपल्या शरीराला पाण्याची गरज जास्तीत जास्त असते. त्यामुळे या दिवसांमध्ये आपण जास्तीत जास्त फळांचे सेवन केल्याने त्याचा फायदा होतो. तसेच उष्णतेच्या लाटेमुळे आपल्याला उलट्या, जुलाब होण्याचा देखील धोका असतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही जांभळाचे सेवन केले तर त्याने तुम्हाला चांगला फायदा होईल.

हिमोग्लोबिन वाढते

आपल्या रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी देखील जांभूळ खूप मदत करते. यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात लोह आणि विटामिन सी असते. हे फळ रक्त शुद्ध करण्यासाठी देखील चांगले गुणकारी आहे. त्याचप्रमाणे तुमची रोगप्रतिकारशक्ती देखील जांभळामुळे वाढते.

हृदय निरोगी राहते

जांभळाच्या सेवनाने तुमच्या हृदयाशी संबंधित असणाऱ्या आजारांचा धोका कमी होतो. ज्या लोकांना उच्च रक्तदाब त्याचप्रमाणे स्ट्रोक यांसारख्या गंभीर आजारांची समस्या आहे. त्यांच्या शरीरात रक्तप्रवाह देखील जांभळामुळे नीट होतो.

मुक्त रॅडिकल्स पासून संरक्षण करते

आपल्या शरीरात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असल्यामुळे ते फ्री रेडीकल्सच्या नुकसानीपासून तुमचे रक्षण करतात. इतकच नाही तर त्यात कॅन्सरविरोधी गुणधर्म देखील आढळतात. त्यामुळे रोज याचे सेवन केल्याने कोलन कॅन्सरचा धोका देखील कमी होतो