हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज-काल अनेक लोक हे आयुर्वेदानुसार त्यांच्या शरीराची काळजी घेत असतात. आयुर्वेद खूप मोठे आहे. याच आयुर्वेदानुसार आपल्या शरीरातील विविध अवयवांच्या 72 हजार नसा बेंबीशी जोडलेल्या असतात. यामध्ये आपल्या डोळ्यांचाही समावेश असतो. त्यामुळे आपल्या बेंबीतून (Benefits of Putting Oil in Navel) जे पोषक पदार्थ जातात. ते आपल्या शरीराच्या अनेक भागांमध्ये जातात. आणि त्याचा फायदा आपल्या शरीराला होत असतो.
त्यामुळेच आपल्या संपूर्ण शरीराचा गाभा बेंबी मानला जातो. याबद्दलची माहिती उत्तरखंडामधील आयुर्वेदिक डॉक्टर शालिनी यांनी दिलेली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या शरीराचे कार्य सुरळीत राहण्यासाठी आपल्या बेंबी तेल घालणे खूप गरजेचे आहे. यामुळे आपल्याला अन्नपचन, पोटदुखी यांपासून फरक पडतो. त्याचप्रमाणे जर एखाद्या व्यक्तीला बद्धकोष्ठता, उलट्या, ऍसिडिटीचा त्रास होत असेल, तर त्या व्यक्तीने जर बेंबीमध्ये मोहरीचे तेल घातले तर त्यांना खूप फायदा होईल.
मोहरीचे तेल बेंबीत घालण्याचे फायदे
मोहरीचे तेल हे खूप फायदेशीर तेल आहे. अनेकजण याचा आहारात देखील वापर करतात. परंतु आपल्या शरीराला जर मोहरीच्या तेलाने मसाज केला, तर त्याचे अनेक फायदे मिळतात. त्याचप्रमाणे तुम्ही झोपताना बेंबीत मोहरीच्या तेलाचे दोन थेंब घातले, तर तुमचे शरीर खूप सुदृढ राहील. मुख्य म्हणजे तुमचा ओठांचा कोरडेपणा दूर होईल. तुमचे ओठ अत्यंत छान गुलाबी आणि मऊ होतील. त्याचप्रमाणे तुम्ही जर मोहरीचे तेल बेंबीमध्ये (Benefits of Putting Oil in Navel) तेल घातले, तर तुमच्या मासिक पाळीत होणाऱ्या वेदना देखील दूर होईल.
तुम्ही जर नियमितपणे तुमच्या बेंबीत (Benefits of Putting Oil in Navel) मोहरीचे तेल घातले, तर तुमच्या सांधेदुखींना आराम मिळेल. शरीराला आलेली सूज देखील कमी होते. त्याचप्रमाणे तुम्हाला जर बद्धकोष्ठता, अपचन, पोटदुखी इत्यादींचा त्रास असेल, तर त्या त्रासापासून देखील तुम्हाला आराम मिळेल. त्याचप्रमाणे तुम्हाला जर कोणत्याही प्रकारची एलर्जी असेल, इन्फेक्शन होत असेल किंवा त्वचेसंबंधित इतर काही समस्या असेल. तरीही बेंबीमध्ये मोहरीचे तेल घातल्याने तुमची त्वचा देखील एकदम छान आणि तजेलदार होईल.
त्याचप्रमाणे डॉक्टर शालिनी यांनी दिलेल्या माहितीनुसार बेबीमध्ये तेल घातल्याने तुमचे मन शांत राहते. आणि तुमची मज्जासंस्था देखील सुधारते. त्यामुळे जर तुम्हाला निद्रानाशाचा त्रास असेल, तर तो देखील कमी होतो. त्याचप्रमाणे तुमचे सौंदर्य वाढवण्यासाठी तुम्ही मेकअप उत्पादन आणि प्रोडक्ट्सवर हजारो रुपये खर्च करता. तरीही त्यातून तुम्हाला चांगला परिणाम मिळत नाही. अशावेळी तुम्ही जर आयुर्वेदिक पद्धतीचा वापर केला, तर तुम्हाला खूप चांगला परिणाम पाहायला मिळेल. तुम्ही तर बेबीमध्ये तेल घातले तर तुमच्या शरीराला 50 पेक्षा अधिक फायदे होतील.