Benefits Of Sound Bath | पाण्याशिवाय करा अंघोळ, ‘ही’ आहे तणाव आणि नैराश्य दूर करण्याची अंघोळीची नवीन पद्धत

Benefits Of Sound Bath
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Benefits Of Sound Bath | बदलत्या काळानुसार आजकाल लोकांच्या अनेक सवयी बदलत चाललेल्या आहेत. खाण्यापिण्याच्या सवयी तर बदलल्याच आहेत. परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, आजकाल लोकांच्या आंघोळीच्या सवयी देखील बदललेल्या आहे. एक काळ असा होता की, गावोगावी पाणी नव्हते. तेव्हा लोक विहिरीजवळ बसून आंघोळ करायचे मग घरी जायचे. त्यानंतर नळातून पाणी भरून आंघोळ करू लागले. काळानुसार त्या नळाच्या जागी शॉवर येऊन बसवले आणि लोकांनाही शॉवर पद्धत खूप आवडू लागली.

त्याचप्रमाणे गेल्या अनेक वर्षांपासून बाथटबमध्ये आरामशीर अंघोळ करण्याचा एक ट्रेण्ड आलेला आहे. अशातच एक नवीन अंघोळीची पद्धत आलेली आहे. ज्यामध्ये आंघोळीसाठी ना पाण्याची गरज असते ना साबणाची. ही पद्धत म्हणजे साऊंड बाथ. (Benefits Of Sound Bath) ही पध्दत आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. या साऊंड बाथमध्ये लोक ध्वनी लहरीद्वारे आंघोळ करतात. त्यामुळे त्यांचा तणाव, चिंता, नैराश्य दूर होण्यास मदत होते. तर आज आपण या एका वेगळ्या पद्धतीबद्दल जाणून घेणार आहोत.

साउंडबाथ म्हणजे काय?

नन्यूयॉर्कने केलेल्या पोस्टनुसार साऊंड बाथ अंघोळीचा वेगळा प्रकार आहे. ज्यामध्ये लोक योगा चॅटवर आरामात झोपतात आणि घंटा किंवा धातूच्या बाऊल सारख्या वाद्य संगीताचा आवाज अनुभवतात. ध्वनी आंघोळ करताना लोक आरामात झोपतात. ध्वनी लहरी त्यांच्या शरीरावर जाऊ देतात. असे केल्याने त्यांना आराम मिळतो आणि त्यांचा नाव देखील दूर होतो एवढेच नाही, तर साऊंड बाथमुळे लोकांच्या वेदना देखील कमी होऊ शकतात. मानसिक दृष्ट्या खचलेल्या लोकांसाठी साऊंडबा ( Benefits Of Sound Bath) खूप मदत करते असे आत्तापर्यंतच्या संशोधनात समोर आलेले आहे.

साउंड बाथचे फायदे | Benefits Of Sound Bath

कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतील सार्वजनिक आरोग्य संशोधन मानसशास्त्र तमारा यांच्या मते ध्वनी आंघोळीमध्ये पाण्याचा वापर केला जात नाही. केवळ ध्वनी लहिरींचा वापर केला जातो. यामुळे तणाव, चिंता आणि राग यांसारख्या गोष्टींपासून मुक्त होण्यासाठी ते प्रभावी मानले जाते. साऊंड बाथ लोकांना आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तणावाचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे वेदना, चिंता, झोपेची समस्या अस्वस्थता पोट खराब होणे. यांसारख्या गोष्टी होतात त्यामुळे बऱ्याच अंशी या साऊंड बाथमधून आराम मिळतो.

साउंड बाथची वेळ

संशोधनातून असे समोर आले आहे की, 15 मिनिटे साऊंड बाथ ( Benefits Of Sound Bath) केल्याने लोकांच्या शरीरातील स्ट्रेस हार्मोन कोर्टीसोल कमी होतो. त्यामुळे लोकांना आराम मिळतो त्यांना शांतता वाटते. त्यांचा मूड देखील सुधारतो. चांगली आंघोळ केल्याने झोप सुधारते आणि मानसिक आरोग्य देखील सुधारते. दररोज पाच ते दहा मिनिटे ही आंघोळ केल्याने लोकांचे आरोग्य चांगले होते. बरेच लोक याला म्युझिक थेरपी देखील म्हणतात. परंतु साऊंड बाथ त्यापेक्षा खूप वेगळी आहे. यामध्ये एक प्रशिक्षक असतो. ज्याला योग किंवा ध्यानासोबत कोणत्याही प्रकारच्या मंत्राचा जप करण्याचा अनुभव आहे. घरात हे फारसे प्रभावी नसते त्यासाठी एक विशेष जागा असते तिथे केल्यानंतरच त्याचा फायदा होतो.