Benefits of Vitamin-E Capsule | व्हिटॅमिन-ई कॅप्सूल त्वचेसाठी आहे फायदेशीर; अशाप्रकारे करा फेसपॅक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Benefits of Vitamin-E Capsule | हिवाळा जवळ आलेला आहे. या हिवाळ्यामध्ये आपल्या त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे असते. हिवाळ्यामध्ये त्वचा अत्यंत रखरखीत आणि कोरडी पडून जाते. अशावेळी त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. यासाठी विटामिन ई खूप महत्त्वाचे आहे. यामुळे त्वचा मॉइश्चराईज होते. तसेच त्वचेवरील डाग धब्बे कमी होण्यास मदत देखील होते. म्हणूनच अनेक ब्युटी प्रॉडक्टमध्ये विटामिन ईचा वापर केला जातो. परंतु ब्युटी प्रॉडक्ट घेणे प्रत्येकालाच परवडत नाही. म्हणून तुम्ही विटामिन ई कैप्सूलचा वापर करून घरच्या घरी फेस मास्क तयार करू शकता. यामुळे तुमची त्वचा देखील अत्यंत मुलायम होईल आणि तुम्हाला जास्त खर्च देखील येणार नाही. आता या विटामिन ईचा (Benefits of Vitamin-E Capsule) आपल्या त्वचेला नक्की कोणते फायदे होतात? हे आपण जाणून घेणार आहोत.

विटामिन ईचे फायदे | Benefits of Vitamin-E Capsule

मॉइश्चरायझेशन

विटामिन ई हे आपल्या त्वचेसाठी खूप महत्त्वाचे असते. विटामिन ई मध्ये मॉइश्चराईज करण्याची क्षमता असते. त्यामुळे आपली त्वचा अत्यंत मऊ आणि दीर्घकाळासाठी कोमल बनते. तसेच आपली त्वचा जास्त कोरडी देखील होत नाही.

अँटिऑक्सिडंट | Benefits of Vitamin-E Capsule

विटामिन ई फ्री रॅडिकल्ससोबत लढून त्वचेचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते. त्यामुळे वृद्धत्वाची चिन्हे कमी दिसतात. आणि आपण चिरकाल तरुण दिसतो.

डाग कमी होतात

विटामिन ईमध्ये त्वचेवरील डाग कमी करण्याची क्षमता असते. त्यामुळे जर तुम्ही दररोज विटामिन ई चा चेहऱ्यावर वापर केला. तर लवकरच तुमची त्वचा अत्यंत नितळ आणि सुंदर होईल.

त्वचेचा रंग सुधारतो

विटामिन ईमध्ये त्वचेचा रंग सुधारण्याची देखील क्षमता असते, यामुळे तुमच्या त्वचेचा रंग तर सुधरतोच परंतु त्या सोबत त्वचा अत्यंत चमकदार आणि तरुण दिसते.

व्हिटॅमिन ईपासून बनवलेले फेस मास्क

  • व्हिटॅमिन ई आणि कोरफड
  • साहित्य:
  • व्हिटॅमिन ई कॅप्सूल
  • टीस्पून एलोवेरा जेल

पद्धत | Benefits of Vitamin-E Capsule

  • व्हिटॅमिन-ई कॅप्सूल फोडून त्यात कोरफड जेल मिसळा.
  • हे मिश्रण स्वच्छ चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनिटे राहू द्या.
  • थंड पाण्याने धुवा.
  • व्हिटॅमिन ई आणि मध

साहित्य

  • 1 व्हिटॅमिन ई कॅप्सूल
  • 1 चमचे मध

पद्धत

  • व्हिटॅमिन-ई कॅप्सूल फोडून त्यात मध मिसळा.
  • हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनिटे राहू द्या.
  • कोमट पाण्याने धुवा.