Bengaluru Mumbai Highway : मुंबईला जोडले जाणार ‘टेक हब’ ; देशातील महत्वाकांक्षी प्रकल्प वाचवणार वेळ आणि पैसा

mumbai news
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Bengaluru Mumbai Highway : मुंबई ही राज्याची आर्थिक राजधानी तर आहेच मात्र देशातील एक महत्वाचे शहर म्हणूनही मुंबईचा नावलौकिक आहे. राज्यातील औद्योगिक पाया आणखी भक्कम करण्यासाठी राज्यातील कनेक्टिव्हीटी वाढवणे खूप महत्वाचे आहे. याकरिता रस्ते खूप महत्वाची भूमिका बजावत असतात. आता राज्यातील महत्वाचे शहर असलेल्या मुंबईला टेक हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरूला (Bengaluru Mumbai Highway) जोडण्यात येणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून देण्यात आलेली आहे.

ही दोन्ही महत्वाची शहर एकमेकांना जोडण्याच्या दृष्टीने हा महामार्ग खूप महत्वाची भूमिका बजावणार आहेत यात शंका नाही. गडकरी यांनीच x च्या माध्यमातून या रस्त्याचे फोटो शेअर करत देशाची (Bengaluru Mumbai Highway) आर्थिक राजधानी टेक हब बंगळुरूशी जोडलं जाणार असल्याचं सांगत ही ‘लाईफलाईन’ सर्वांपुढे आणली.

पर्यावरणपूरक असेल महामार्ग (Bengaluru Mumbai Highway)

पर्यावरण पूरक पर्यायांवर भर देत तयार करण्यात आलेल्या या रस्त्याचा वापर मुंबई आणि बंगळुरूतील (Bengaluru Mumbai Highway) अंतर आणखी कमी करणार आहे. कर्नाटकातील चित्रदुर्ग- दावणगिरी इथं हा 72 किमी अंतराचा सहा पदरी रस्ता तयार करण्यात आला आहे.

या प्रकल्पासाठी साधारण 1400 कोटी रुपयांचा एकूम खर्च अपेक्षित आहे. भविष्यात त्याच्या देखभालीसाठी National Highway Authority of India (NHAI) च्या वतीनं काही शाश्वत तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. गडकरी यांच्या माहितीनुसार हा प्रकल्प कर्नाटकातील नेलमंगला (Bengaluru Mumbai Highway) ते देवीहल्ली या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 75 चा एक भाग असणार आहे. बंगळुरू आणि मुंबईमधील प्रवासवेळ कमी करण्यासोबतच हा महामार्ग चित्रदुर्ग आणि दावणगिरी येथील भूखंड व्यावसायिकांसाठी भरभराटीला ठरणार आहे.