Post Office Scheme| सध्या पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांचा लाभ घेता येत आहे. यामध्ये सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणाऱ्या उपयुक्त अशा काही योजनांमध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना यांचा समावेश आहे. अशा योजना सध्या नागरिकांना अधिक आकर्षित करत आहेत. आज आपण याच योजनांविषयी जाणून घेणार आहोत.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी केंद्र सरकारने सुरू केलेली प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना एक टर्म इन्शुरन्स योजना आहे. या अंतर्गत केवळ 436 रुपयांच्या वार्षिक प्रीमियमवर 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते. 18 ते 50 वयोगटातील कोणतीही व्यक्ती ही योजना घेऊ शकते. पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला ही रक्कम मिळते, जी त्यांना आर्थिक मदतीसाठी उपयोगी पडते.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (Post Office Scheme)
अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व यांसाठी तयार करण्यात आलेली प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अत्यंत कमी किमतीत नागरिकांसाठी उपलब्ध आहे. या योजनेत केवळ 20 रुपये वार्षिक प्रीमियम भरून 2 लाख रुपयांपर्यंत अपघात विमा मिळतो. यामध्ये अपघातामुळे मृत्यू झाल्यास पूर्ण विम्याची रक्कम तर अपंगत्व आल्यास 1 लाख रुपये मिळतात. 18 ते 70 वर्षे वयोगटातील व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
अटल पेन्शन योजना (APY)
निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य हवे असणाऱ्यांसाठी अटल पेन्शन योजना फायदेशीर पर्याय आहे. 18 ते 40 वयोगटातील नागरिक यामध्ये सहभागी होऊ शकतात. (Post Office Scheme) मासिक ठराविक योगदानाद्वारे निवृत्तीनंतर दरमहा 5,000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळण्याची सुविधा या योजनेद्वारे दिली जाते. गुंतवणुकीच्या रकमेनुसार निवृत्ती लाभ ठरतो, त्यामुळे भविष्यासाठी योग्य नियोजन करता येते.