हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिवाळ्याचे वातावारण असल्याने सर्वत्र थंडी पडत आहे. अशा थंडीत मनसोक्त फिरण्याचा अनेकजण प्लॅन करत आहेत. तुम्हीही जर असाच फिरण्याचा प्लॅन करत असाल आणि तेही भारतात तर तुम्ही या 6 ट्रेकिंगच्या ठिकाणांना नक्कीच भेट देऊ शकता.
आजकालच्या तरुण वर्ग हा जास्तकरून फिरण्यासाठी ट्रेकिंगचा पर्याय निवडत आहेत. तुम्हालाही जर आपल्या मित्रांबरोबर निसर्गाच्या सानिध्यात ट्रेकिंगचा आनंद घेत वेळ घालवायला आवडत असेल तर आणि ट्रेकिंगसाठी नवीन जागा शोधत असाल तर भारतातही 6 अशा ट्रेकिंग पॉइंट्सला तुम्ही भेट देऊ शकता. कारण हि ट्रेकिंग पॉईंट्स तुमच्यासाठी सुरक्षित आणि उत्तम अशी आहेत.
काश्मीर ग्रेट लेक्स ट्रेक (Kashmir Great Lakes Trek)
तुम्हाला जर बर्फात मनसोक्तपणे फिरायचं असेल तर काश्मीर ग्रेट फ्लेक्स ट्रेक हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. हा अतिरेक पॉईंट म्हणजे प्रत्यक्ष पृथ्वीवरील स्वर्गाचा अनुभव घेण्यासारखा आहे. या ट्रेक दरम्यान तुम्हाला अनेक निसर्गाच्या छटा बघायला मिळतील. त्याचबाबरोबर तुम्हाला काश्मीरमधील सौंदर्य सृष्टीच्या छटा दिसतील. आणि पांढऱ्याशुभ्र हिमालयाचा सुंदर नजराना दिसेल. काश्मीर मधील मोजकेच हिमालय ट्रेक आहे. त्यातील प्रसिद्ध हा ट्रेक. ट्रेक मॉडरेट ते डिफिकल्ट प्रकारात आहे. ह्या ट्रेक मधील सौंदर्य अफलातून आहे. एक आगळा वेगळा अनुभव म्हणून प्रत्येक गिर्यारोहकाने हा ट्रेक करायला हरकत नाही.
गोमुख तपोवन ट्रेक (Gomukh Tapovan Trek)
भारतातील उत्तराखंड राज्यांमध्ये उत्तरकाशी जिल्ह्यात गोमुख तपोवन ट्रेक हा एक ट्रेकिंग प्रेमींसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. गोमुख तपोवन ट्रेकमध्ये भव्य शिवलिंग पर्वताचे शिखर आहे. हिमालय पर्वतरांगेचा आनंद लुटण्यासाठी गोमुख तपोवन हा एक उत्तम ट्रेक आहे. गोमुख किंवा गायमुख हे भारतातील उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगोत्री हिमनदीचे टोक आहे. जिथून भागीरथी नदी सुरू होते, गंगा नदीचा एक प्रमुख स्त्रोत आहे. 4 हजार 23 मीटर (13 हजार 200 फूट) वर वसलेले हे ठिकाण हिंदू धर्मातील एक पवित्र स्थान आणि तीर्थक्षेत्र आहे.
व्हॅली ऑफ फ्लॉवर ट्रेक (Valley of Flowers Trek)
तुम्हाला जर फुलांच्या ठिकाणी फिरायला आवडत असेल तर तुमच्यापुढे भारतातील उत्तराखंड राज्यांमध्ये व्हॅली ऑफ फ्लॉवर ट्रेक चांगला पर्याय आहे. या ट्रेकमध्ये तुम्हाला सर्वोत्तम फुलाने आच्छादलेले दृश्ये दिसतील. व्हॅली ऑफ फ्लॉवर या ट्रेकसाठी जगभरातील ट्रेकर्स या ठिकाणी दरवर्षी भेट देतात. व्हॅली ऑफ फ्लावरमध्ये असलेले निसर्ग सौंदर्य आपल्याला एक अविस्मरणीय अनुभव देते. व्हॅली ऑफ फ्लॉव्हर्स हे भारतातील उत्तराखंड राज्यातील राष्ट्रीय उद्यान आहे. नंदादेवी राष्ट्रीय उद्याना बरोबर हे नंदादेवी रिझर्व बनवते. या उद्यानाला येथील अत्यंत वैविध्यपूर्ण निसर्गामुळे जागतिक वारसा स्थान म्हणून मान मिळालेला आहे.
व्यास कुंड ट्रेक (Vyas Kund Trek)
भारतातील हिमाचल प्रदेश राज्यातील मनालीमध्ये भव्य व्यास कुंड ट्रेक आहे. या ट्रेक दरम्यान तुम्हाला सुंदर तलाव आणि त्याच्या आजूबाजूला पसरलेली नैसर्गिक दृश्य अविस्मरणीय अनुभव देतील. व्यास कुंड, एक पवित्र तलाव मानले जाते, हे कुल्लू खोऱ्यात आहे आणि बियास नदीचे मूळ स्त्रोत आहे. असे मानले जाते की व्यास ऋषी हनुमान टिब्बा आणि सात बहिणींच्या मांडीवर 3,650 मीटर उंचीवर असलेल्या या तलावाच्या मूळ पाण्यात दररोज स्नान करत असत. सोलांग व्हॅलीमार्गे बियास कुंडाचा रस्ता हा एक हृदयस्पर्शी प्रवास आहे.
किन्नर कैलास ट्रेक (Kinner Kailash Trek)
किन्नर कैलास ट्रेक हा भारत आणि तिबेटच्या सीमेवर पसरलेला ट्रेक आहे. या ट्रेक दरम्यान तुम्हाला हजारो वर्ष जुनी बौद्ध संस्कृती जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळते. त्यामुळे ट्रेकिंग प्रेमी आणि इतिहास प्रेमी लोकांसाठी किन्नर कैलास ट्रेक हा एक सर्वोत्तम ट्रेकिंग पर्याय आहे. किन्नर कैलास हा हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यातील तिबेट सीमेजवळ स्थित 6050 मीटर उंच पर्वत आहे. या पर्वताचे वैशिष्टय़ हे आहे की तो एकावर आहे.
त्रिउंड ट्रेक (Triund Trek)
हिमाचल प्रदेशमधील उंचच उंच पर्वतरांगा देश-विदोशातील पर्यटकांना ट्रेकिंगसाठी खुणावत असतात. अशा ठिकाणी रोमांचक अनुभव घेण्याची हौस असलेलेच पर्यटक जास्त जातात. या ठिकाणचा त्रिउंड ट्रेकदेखील असाच एक अनुभव तुम्हाला नक्कीच देऊ शकतो. उंच डोंगर आणि त्यामधून वाहणारे झरे वाटेवर तुमच्या स्वागतासाठी सज्ज असतात. हिमाचलच्या कांगडा जिल्ह्यातील हे एक छोटंसं हिल स्टेशन आहे. जे धर्मकोट हिल स्टेशनचाच एक भाग आहे. जमिनीपासून 2828 मीटर उंचीवर असल्याने तुमचे मन या ठिकाणी आल्यावर नक्कीच रमेल.