हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन BEST AC Buses। मुंबईकरांसाठी खुशखबर आहे. १ जूनपासून बेस्ट (BEST) त्यांच्या बस वेळापत्रकात बदल करणार आहे. दक्षिण मुंबई आणि पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये धावणाऱ्या एकूण ३० बस मार्गांमध्ये बदल केले जातील. त्यानुसार, काही मार्गांवर काही बसेस शॉर्ट टर्मिनेट केल्या जातील, काही नॉन-एसी बसेस एसीमध्ये रूपांतरित केल्या जातील आणि नवीन मार्ग जोडले जातील. यातीलच एक रूट म्हणजे ठाण्यातील बाळकुम ते मंत्रालय बस सेवा (Balkum to Mantralaya Bus) …. या रूट वर नवीन एसी बस मार्ग सुरू करण्याची घोषणा झालीय. या बसचे नॉन एसी मधून एसी मध्ये रूपांतर करण्यात आलं आहे. त्यामुळे प्रवाशांना गार गार प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.
नवीन AC बस मार्ग A 490 ईस्टर्न फ्रीवे आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून प्रवास करेल. सकाळी आणि संध्याकाळी ही एसी बस चालवली जाणार आहे. या नव्या ऐसी बसच्या वेळापत्रकाबाबत बोलायचं झालं तर ठाण्यातील बाळकुम येथून ही बस सकाळी ७.३० आणि ८ वाजता हि बस धावेल, तसेच परतीच्या प्रवासात ही गाडी मंत्रालयातून संध्याकाळी ५.३० आणि ६ वाजता धावेल. या गाडीचे तिकीट दर हे साधारणतः 50 ते 60 रुपयांच्या दरम्यान राहू शकते असा अंदाज आहे. या नवीन एसी बस सेवेमुळे (BEST AC Buses) मुंबई ते ठाणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल असे बोलले जात आहे. तस बघितलं तर मुंबई ते ठाणे दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या सकाळी आणि संध्याकाळी सर्वाधिक असते त्यामुळे त्याच वेळी हि बस धावेल.
१ जूनपासून या मार्गावर धावणार AC बस – BEST AC Buses
१ जूनपासून पश्चिम ते जनकल्याण नगर पर्यंत रूट २४३, गोरेगाव स्टेशन पूर्व ते फिल्म सिटी पर्यंतचा मार्ग ३४३, गोरेगाव बस स्टेशन पूर्व ते संकल्प सोसायटी/नागरी निवारा प्रकल्प-४ पर्यंतचा मार्ग ३४४, गोरेगाव बस स्टेशन पूर्व ते गोकुळधाम पर्यंतचा मार्ग ३४७, गोरेगाव बस स्टेशन पूर्व ते मयूर नगर पर्यंतचा मार्ग ४५२, मुलुंड रेल्वे स्टेशन ते मालवणी डेपो पर्यंतचा मार्ग ४५९, कांजूरमार्ग ते हिरानंदानी पवई पर्यंतचा मार्ग ६०२ आणि मालाड स्टेशन पश्चिम ते भुजले तलाव पर्यंतचा मार्ग ६२६ या मार्गावर साध्या बसेस ऐवजी एसी बस धावतील.