गेल्या 5 वर्षात Best Agrolife च्या शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला 6,900 टक्के रिटर्न !!!

Best Agrolife
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज शेअर बाजारात Best Agrolife च्या शेअर्सने गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. गुरुवारी देखील या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली. या दरम्यान NSE वर या शेअर्सने 15 टक्क्यांनी उसळी घेत 1,280 रुपयांची पातळी गाठली. गेल्या 5 वर्षात या मल्टीबॅगर स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 6,900 टक्के इतका मजबू रिटर्न दिला आहे. हे लक्षात घ्या कि, शेअर बाजारात बिग व्हेल नावाने ओळखल्या जाणाऱ्या आशिष कचोलियानेही यामुळेच एका मोठ्या कराराद्वारे कंपनीचे 3,18,000 शेअर्स खरेदी केले आहेत.

Best Agro Life

एका मीडिया रिपोर्टनुसार, NSE वरील आकडेवारीनुसार, 30 ऑगस्ट रोजी आशिष कचोलियाने एका मोठ्या डीलद्वारे मध्ये 940 रुपयांच्या हिशेबाने Best Agrolife चे एकूण 3,18,000 शेअर्स विकत घेतले आहेत. यासाठी त्याने 29,91,99,840 रुपये खर्च केले आहेत. ही बातमी बाहेर पडताच हे शेअर्स रॉकेटप्रमाणे वर चढू लागले. हे लक्षात घ्या कि, आजही या शेअर्समध्ये अप्पर सर्किट दिसून आले. Best Agrolife ची सध्याची मार्केट कॅप 3002 कोटी आहे. ही कंपनी BSE आणि NSE वर लिस्टेड आहे . BSE वर याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1,399.70 रुपये आहे.

Four money tasks you should do in the new financial year 2022-23

गेल्या 5 सत्रांमध्ये 39 टक्क्यांनी वाढ

BSE वर गेल्या 5 ट्रेडिंग सत्रांमध्ये Best Agrolife च्या शेअर्समध्ये सुमारे 39 टक्के वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे गेल्या 1 महिन्यात तो 32 टक्क्यांनी वाढला आहे. तसेच गेल्या 6 महिन्यांत गुंतवणूकदारांना 33 टक्के तर गेल्या 1 वर्षात सुमारे 65 टक्के नफा मिळाला आहे. हे जाणून घ्या कि, गेल्या दीड वर्षात Best Agrolife मध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यावेळी यामध्ये 500 टक्क्यांनी वाढ झाली असून तो 190 रुपयांवरून 1263 रुपयांवर पोहोचला आहे. 5 वर्षांपूर्वी 18 रुपये किंमत असलेला हा शेअर आज 1263 रुपयांवर पोहोचला आहे. यावेळी या शेअर्सने 6,937 टक्के रिटर्न दिला आहे.

This multibagger stock hits upper circuit; zooms over 550% in one year - BusinessToday

शेअर्समध्ये वाढ का झाली ???

कोरोना काळापासून Best Agrolife च्या शेअर्सची गुंतवणूकदारांना सातत्याने चांगला रिटर्न दिला असल्याचे बाजारातील तज्ज्ञांनी म्हंटले आहे. दीर्घ कालावधीमध्ये या शेअर्सची मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे. आता आशिष कचोलियाच्याने शेअर्स खरेदी केल्याची बातमी बाहेर आल्यानंतर यामध्ये आणखी वाढ झाली आहे.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.bestagrolife.com/

हे पण वाचा :

ATM मधून पैसे काढण्यासाठी बँकांचे काय नियम आहेत ते समजून घ्या !!!

Post Office च्या ‘या’ योजनेत दररोज 95 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 14 लाख रुपये !!!

Tamilnad Mercantile Bank च्या FD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर तपासा

Gold Price Today : सोने- चांदीच्या किंमतीत मोठी घसरण; पहा आजचे दर

Multibagger Stock : ‘या’ केमिकल कंपनीच्या शेअर्सने गुतंवणूकदारांना केले मालामाल !!!