शेतात ‘याची’ लागवड केली तर शेतकरीही कमवू शकतो लाखो रुपये; खर्च केवळ ५० हजार

Alovera Farming
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील बहुतांश लोकसंख्या ही गावभागात राहते. मात्र येथील बरेच लोक रोजगारासाठी बाहेर जात असतात. गावात रोजगाराचे फारसे पर्याय उपलब्ध नसल्याची धारणा या लोकांची असते. आज आपण अशा काही व्यवसायांची माहिती घेऊया ज्यातून गावी राहून आपण चांगले पैसे कमवू शकतो. साधारण ४० ते ५० हजार रुपये गुंतवून हे व्यवसाय सुरु करता येतात. मात्र यातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळू शकते.

कोरफडीची शेती  (Aloevera cultivation) – कोरफडीची शेती हा एक उत्तम व्यवसाय आहे. यासाठी शेतात एकदा रोपे लावण्याची  गरज असते. यानंतर साधारण ३ वर्षे पीक मिळत राहते.  जर १ हेक्टर शेतीत ही शेती केली तर वर्षाला साधारण ९ ते १० लाख रुपयांपर्यंत नफा मिळतो.  सध्या बाजारात कोरफडीला विविध कारणांसाठी  मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

खजूर शेती (Date farming) – या शेतीतून मोठी कमाई करता येऊ शकते, सध्या शेतकरी या व्यवसायातून लाखो रुपयांचा नफा कमवीत आहेत. मात्र ही शेती करण्यासाठी योग्य माहितीची आवश्यकता असते. सोबतच जमिनीची समज असणेही गरजेचे असते. ही सगळी माहिती घेऊन शेती केल्यास भरपूर नफा मिळू शकतो, साधारण १०-१५ लाख वार्षिक उत्पन्न घेता येऊ शकते.

फुलशेती (Flower farming) – हल्ली फुलांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अगदी सगळेजण पूजा, सजावट आणि इतर उपयोगासाठी फुलांचा वापर करतात. त्यामुळे फुलांच्या शेतीतही मोठ्या प्रमाणात नफा कमवता येतो. आपण विविध प्रकारच्या फुलांची शेती करू शकतो. या शेतीसाठी सरकारकडूनही मदत मिळू शकते. केवळ अर्धा एकर शेतीतही १० ते ११ लाख रुपये नफा मिळू शकतो.