Wednesday, March 29, 2023

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा घट्ट विळखा; आज तब्बल 456 रुग्णांची भर

- Advertisement -

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 456 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 14343 झाली झाली आहे. आज दिवसभरात 285 रूग्ण बरे झाले असून जिल्ह्यात आतापर्यंत 9873 रूग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात सध्या 3862 रूग्ण उपचार घेत असून आतापर्यंत 608 रूग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

आज जिल्ह्यात झालेली रुग्ण वाढ पुढीलप्रमाणे- जळगाव शहर 77, जळगाव ग्रामीण 14, भुसावळ 15, अमळनेर 96, चोपडा 56, पाचोरा 33, भडगाव 13, धरणगाव 27, यावल 4, एरंडोल 18, जामनेर 31, रावेर 18, पारोळा 24, चाळीसगाव 9, मुक्ताईनगर 13, बोदवड 6 अशी रुग्ण संख्या आहे.

- Advertisement -

जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या गेल्या चोवीस तासात सुमारे 2072 चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत 63 हजार 146 व्यक्तींच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. गेल्या दोन महिन्यात जिल्ह्यात चाचण्यांचे प्रमाण दहापटीने वाढले असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.