विनामास्क वाहन चालवत असाल तर सावधान ! तुमचे वाहन ‘ब्लॅक लिस्ट’ झाले तर नाही ना ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – शहरात तुम्ही जर दुचाकी-चारचाकीतुन विनामास्क फिरला असाल तर कदाचित तुमचे वाहन ब्लॅकलिस्ट झालेले असू शकते. कारण आरटीओ कार्यालयाने विनामास्क फिरणाऱ्या 1875 चालकांचे वाहन ब्लॅकलिस्ट केले आहे.

कोरोना च्या तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून गेल्या काही दिवसांपासून शहरात विनामास्क फिरणाऱ्या वाहनचालकांचे फोटो काढून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. यात विनामास्क वाहनधारकांविरुद्ध महापालिकेच्या पथकाकडून फोटो काढण्यात येत आहेत‌. ते फोटो आरटीओ कार्यालयाच्या मेल आयडी वर पाठवले जात आहेत. त्यानंतर वाहन चालकांना ई-चलन पाठवण्यात येते. दंड भरला नाही तर वाहनधारकांना टॅक्स, पीयूसी, इन्शुरन्स, फिटनेस करता येणार नाही.

एवढेच नव्हे तर वाहन मालकाला वाहन विक्री करता येणार नाही. ई-चलान पाठवण्यात आलेल्या वाहनधारकांनी आलेल्या दंडाची रक्कम त्वरित भरली तर त्यांचे वाहन ब्लॅकलिस्टमध्ये जाण्यापासून वाचू शकते. आतापर्यंत 1875 वाहने ब्लॅकलिस्ट करण्यात आली आहेत.