URL Checker App : सध्या सोशल मीडिया हे सर्वात जास्त वापरले जाणारे साधन आहे. याच्या माध्यमातून नेटकऱ्यांच्या सर्व गोष्टी सोप्प्या झाल्या आहेत. मात्र काही वेळा सोशल मीडियावर तुम्ही न कळत केलेल्या चुका तुम्हाला अडचणीत आणू शकतात. यासाठी खबरदारी घेणे खूप गरजेचे आहे.
कारण मागील काही कालपासून देशातच नव्हे तर जगभरात सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या हेतूने काही काळापूर्वी एका सायबर सिक्युरिटी फर्मनेही एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये एक धक्कादायक खुलासा झाला आहे.यामध्ये त्यांनी एका भारतीय यूजरला दररोज 12 फेक मेसेज येत असल्या दावा केला आहे. हे सर्व संदेश लोकांपर्यंत मजकूर, ईमेल आणि सोशल मीडियाद्वारे पाठवले जात आहेत. या अहवालात असेही समोर आले आहे की 82% लोक असे आहेत जे या मेसेज किंवा लिंकवर क्लिक करतात आणि जाळ्यात अडकतात.
दरम्यान, तुम्हीही नक्कीच अशा सायबर गुन्ह्यांच्या जाळ्यात अडकले असाल. यामुळे लोकांना खूप नुकसान सहन करावे लागते. मात्र जर तुम्हाला या सर्व प्रकारातून वाचायचे असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी काही महत्वाचे उपाय आणले आहेत. यासाठी आम्ही उत्तम अॅप्लिकेशन घेऊन आलो आहोत. याचा वापर करून तुम्ही लिंक न उघडताही सर्व तपशील जाणून घेऊ शकता. या अॅपचे नाव URLCheck आहे जे Play Store वर उपलब्ध आहे.
हे URL चेक अॅप कसे काम करते?
तुम्हालाही फ्रॉड लिंक स्कॅम टाळायचा असेल तर हे अॅप तुमची खूप मदत करू शकते. हे वापरण्यास देखील बरेच सोपे आहे. एकदा तुम्ही अॅप इन्स्टॉल केल्यानंतर, प्रत्येक वेळी तुम्ही लिंकवर टॅप करता तेव्हा एक पॉप-अप विंडो उघडेल. लिंकशी संबंधित सर्व तपशील या विंडोमध्ये दृश्यमान असतील. लिंकचा मुख्य स्त्रोत काय आहे? लिंकवर क्लिक केल्यावर कोणते पेज उघडेल किंवा कोणते अॅप ऑटो इन्स्टॉल होईल हे कळेल. ही सर्व माहिती तुम्हाला पॉप-अप विंडोमध्ये लिंक उघडण्यापूर्वीच मिळेल. आता हे अॅप कसे वापरायचे याबद्दल खाली सविस्तर जाणून घ्या…
URL चेक अॅप कसे वापरावे?
– सर्वप्रथम, तुमच्या डिव्हाइसवर Play Store वरून URL Check अॅप इंस्टॉल करा.
– यानंतर अॅप ओपन करा.
– येथे अॅप तुम्हाला काही परवानग्या विचारेल, परवानगी द्या.
– यानंतर डिफॉल्ट ब्राउझरसह अॅप सेट करा.
– असे केल्याने तुमचे काम पूर्ण होईल.
– यानंतर, जेव्हाही तुम्ही कोणत्याही लिंकवर क्लिक कराल तेव्हा तुम्हाला पॉप-अप विंडोमध्ये सर्व माहिती दिसेल. अशा प्रकारे तुम्ही हे अँप वापरू शकता.