सावधान ! Play Store वरील ‘हे’ 17 अँप्स तुमच्यासाठी ठरतील धोकादायक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Google Play Store : सध्या सोशल मीडिया माध्यम हे सायबर गुन्हेगारीचे मोठे ठिकाण बनले आहे. अनेक लोक याच्या माध्यमातून अडचणीत येत आहेत. मात्र जर तुम्ही योग्य खबरदारी घेतली तर नक्कीच तुम्ही अशा अडचणीतून वाचू शकता. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला असेच एक माध्यम सांगणार आहे ज्याचा वापर देशात लाखो लोक करत आहेत.

आम्ही तुम्हाला Google Play Store बद्दल सांगत आहे. सध्या Google Play Store वरती 17 अॅप्स हे धोकादायक आहेत. जे स्वत:ला अस्सल वैयक्तिक कर्ज म्हणून वेसतात. मात्र Google ने भारत आणि इतर देशांतील वापरकर्त्यांना लक्ष्य करत यापैकी 17 अॅप्स आपल्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकले आहेत.

अहवालातुन मिळालेली माहिती

ESET संशोधन अहवालानुसार, या अॅप्सना काढून टाकण्यापूर्वी Google Play वरून जगभरात 12 दशलक्षाहून अधिक डाउनलोड केले गेले होते. अशा फसव्या अँड्रॉइड लोन अॅप्सना ‘स्पायलोन अॅप्स’ असे नाव देण्यात आले आहे. ESET संशोधक लुकास स्टेफॅन्को यांनी अनेक स्पायलोन अॅप्सचा पर्दाफाश केला आहे. यामध्ये लोकांची फसवणूक करण्यासाठी आणि वैयक्तिक माहितीच्या विस्तृत श्रेणीची चोरी करण्यासाठी ते अत्याधुनिक तंत्रे देखील वापरतात.

लोकांना ब्लॅकमेल केले जाते

रिपोर्टनुसार, या अॅप्सद्वारे पीडितांना ब्लॅकमेल केले जाते आणि जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांचा छळ केला जातो.
हे लोक प्रामुख्याने मेक्सिको, इंडोनेशिया, थायलंड, व्हिएतनाम, भारत, पाकिस्तान, कोलंबिया, पेरू, फिलीपिन्स, इजिप्त, केनिया, नायजेरिया आणि सिंगापूरमध्ये काम करतात.
डेटा गोळा करणे आणि ब्लॅकमेल करणे याशिवाय, हे अॅप्स आधुनिक काळातील डिजिटल व्याजखोरीचे एक प्रकार दर्शवितात, असुरक्षित व्यक्तींचा गैरफायदा घेत कर्जावर जास्त व्याजदर आकारतात.
या कर्जांची एकूण वार्षिक किंमत (TAC) सांगितल्यापेक्षा खूप जास्त आहे आणि कर्जाची मुदत सांगितल्यापेक्षा खूपच लहान आहे.
अहवालात असेही म्हटले आहे की काही प्रकरणांमध्ये, पीडितांना सांगितलेल्या 91 दिवसांऐवजी पाच दिवसांत कर्जाची परतफेड करण्यासाठी दबाव आणला गेला. तसेच, कर्जाचा TAC 160 टक्के ते 340 टक्के दरम्यान होता.