देहरादून । कोरोना जागतिक साथीच्या आजारामुळे देशभरात सध्या लॉकडाउन लागू करण्यात आले आहे. एकीकडे पोलिस प्रशासनातर्फे संचारबंदीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे, तर दुसरीकडे बरेच राजकारणी नियम मोडण्यात कसलीही कसर सोडत नाहीत. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी असाच एक पराक्रम केला असल्याचे बोलले जात आहे. राज्यपालांनी जैनी उर्फ जयंती नावाच्या एका मॉडेलला महाराष्ट्रातून विशेष हेलिकॉप्टरमार्फत दिल्ली येथे जाण्यास मदत केल्याचे वृत्त पंजाब केसरी ने दिले आहे.
विशेष म्हणजे राज्यपालांनी आपल्या पदाचा वापर करुन सैन्याच्या हॅलीकाॅप्टरने आणि गाडीने देहराडून पर्यंत पोहोचवल्याचं म्हटलं जात आहे. याबाबत एका माजी IAS अधिकारी राहिलेल्या प्रदिप कस्नी नावाच्या फेसबुक अकाऊंटवरुन भारतीय सैन्यावर आरोप करण्यात आला आहे. तसेच वेटरन जवान पूर्व सैनिक नावाच्या एका फेसबुक पेजने याबाबत भारतीय सैन्याने यावर खुलासा करावा अशी मागणी केली आहे.
सदर मॉडेल ला सैन्याच्या गाडीने देहरादून येथील त्यांच्या घरी पाठविण्यात आले. नंतर त्या मॉडेल ला कुटुंबासहित क्वारंटाईन मध्ये राहण्यास सांगण्यात आले. मात्र तरीही सदर मॉडेल नियमांचे पालन करत नसल्याचे बोलले जात आहे. मॉडेल जेनी उर्फ जयंती तिच्या वडिलांसोबत नवोदय विद्यालयाच्या क्वार्टरमध्ये असलेल्या दोन खोलीत राहत आहे. तिचे वडील शिक्षण संचालनालयामध्ये परिचारक म्हणून कार्यरत आहेत. नियमांनुसार, त्याच्या वडिलांना देखील होम क्वारेन्टाईनमध्ये घरीच राहणे अपेक्षित आहे. मात्र त्यांचे वडील बरेच दिवस कार्यालयात येत आहेत आणि हजेरी लावत आहेत. आता सदर मॉडेलच्या कुटुंबियांवर कारवाई होणार आहे का?, तसेच मॉडलला देहरादूनला जाण्यास मदत केल्याप्रकरणी राज्यपालांवर कावाईल होणार का?, आदी प्रश्न्नावर चर्चा सुरु आहे.