दुबईच्या बुर्ज खलिफापेक्षाही उंच आहे महाराष्ट्रातील हा किल्ला; ट्रेकर्ससाठी आव्हानात्मक

0
2
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राला किल्ल्यांचा गौरवशाली वारसा लाभला असून, अनेक किल्ल्यांनी महाराष्ट्राला वेढलेले आहेत. काही किल्ल्यांवर सहज चढता येते तर काहीवर चढने फार कठीण. असाच एक अत्यंत कठीण किल्ला म्हणून सह्याद्री पर्वतरांगेतील माळशेज घाटात वसलेला भैरवगड किल्ला (Bhairavgad Fort) ओळखला जातो. काहीजण असा दावा करतात की हा किल्ला दुबईच्या बुर्ज खलिफापेक्षा उंच आहे. उंचीमुळे ट्रेकर्सच्या दृष्टिकोनातून एक अत्यंत आव्हानात्मक ठिकाण मानले जात असले तरी , अनके लोक इथं जात असतात.

माळशेज घाटात वसलेला भैरवगड किल्ला –

मुंबई – कल्याण – मुरबाड मार्गे माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या मोरोशी गावापासून दूरवरून या किल्ल्याचा भव्य देखावा दिसतो. किल्ल्यावर चढाई करताना ट्रेकर्सना कातळात खोदलेल्या आयताकृती गुहेत जावे लागते. गुहेत प्रवेश करताना विशेष गिर्यारोहण तंत्राचा वापर करावा लागतो. गुहेच्या पुढील पायऱ्या उध्वस्त झालेल्या आहेत, ज्यामुळे दोऱ्याचा आधार घेऊनच चढाई करावी लागते. या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला कातळकडा आणि खोल दरी आहे, त्यामुळे येथे चढाई करणे अत्यंत धाडसी आणि जोखमीचे आहे.

रोपांचा वापर न करता चढाई करणे अशक्य –

भैरवगड किल्ल्याचा बालेकिल्ला 400 फूट उंच बेसॉल्ट खडकावर वसला आहे. या किल्ल्याची रचना ज्वालामुखी उद्रेकातून उधळलेला लाव्हा थंड होऊन तयार झालेल्या वैशिष्ट्यपूर्ण संरचनांमुळे घडली आहे. लाव्हाच्या थरांच्या चांगल्या साचण्यामुळे या किल्ल्याच्या भव्यतेत आणखी भर पडली आहे. ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील मोरोशी गावाच्या पलीकडे असलेला भैरवगड किल्ला ट्रेकर्ससाठी एक अवघड, पण आव्हानात्मक आणि रोमांचक ठिकाण आहे. या किल्ल्याचे आकर्षण आणि त्यावर चढाई करताना मिळणारा रोमांच प्रत्येक ट्रेकरला एक अविस्मरणीय अनुभव देतो. महाराष्ट्रातील सर्वात कठिण किल्ल्यांमध्ये समाविष्ट असलेला भैरवगड किल्ला ट्रेकरसाठी एक अत्यंत कठिण आणि धाडसी साहस ठरतो, ज्यात रोपांचा वापर न करता चढाई करणे अशक्य आहे. त्यामुळे, ज्यांना किल्ल्यांवर चढाई करण्याचा शौक आहे, त्यांच्यासाठी हा किल्ला एक आव्हान असतो.