मुंबई | सध्या देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीच्या मुद्यावरून उलट सुलट प्रतिक्रिया येत आहेत. अनेकजण या कायद्याला विरोध करताना दिसत आहेत. साहित्यिक, ज्ञानपीठ विजेते लेखक भालचंद्र नेमाडे यांनी देखील नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर भाष्य केले आहे. नेमाडे यांनी म्हंटले की, हे अराजकतेच लक्षण आहे. यातून आपल्याला बाहेर पडता येणं कठीण आहे. आपल्या देशात अशी परिस्थिती नव्हती. आपण पाकिस्तानच्या दिशेने वाटचाल करत आहोत. मुंबईतील एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
‘हर दिल्लीवाले से डर लगता है’
या कार्यक्रमाला प्रसिद्ध कवी गुलजार देखील उपस्थित होते. कधी कोणता कायदा आणतील आपल्याला माहीत नाही, हर दिल्ली वाले से डर लगता है अशी प्रतिक्रिया गुलजार यांनी दिली आहे. या कार्यक्रमात साहित्यिक भालचंद्र नेमाडे आणि कवी गुलजार उपस्थित होते.