नाल्यात पोहताना दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू

bhandara crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडाऱ्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये नाल्यात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत तरुण सकाळच्या सत्रातील शाळा सुटल्यानंतर मित्रांसोबत नाल्यावर पोहायला गेले होते. खूप शोधाशोध केल्यानंतर रात्री उशिरा या दोघांचे मृतदेह आढळून आले. धवल रामू परशुरामकर आणि भावेश अशोक भोंडे अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे दोघेही नवजीवन कॉन्व्हेंटमध्ये पाचव्या वर्गात शिकत होते.

नेमकं काय घडलं?
घटनेच्या दिवशी धवल सायकलने गेला होता, सकाळी 11 वाजले तरी तो घरी परत आला नव्हता. त्यामुळे त्याच्या पालकांनी त्याचा सर्वत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला. यानंतर प्रगती कॉलनीजवळ असलेल्या नाल्याजवळ एक सायकल आढळून आली. यानंतर मुलांच्या पालकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी शोधमोहीम राबवली असता रात्री उशिरा या धवल आणि भावेशचा मृतदेह आढळून आला.

मित्र घटनास्थळावरून फरार
धवल आणि भावेश त्या नाल्यात बुडत असताना त्याचे मित्र घटनास्थळावरून पसार झाले. या मुलांनी कोणालाही याची माहिती दिली नाही. यानंतर रात्री उशिरा नाल्यात या मुलांचे मृतदेह आढळून आले. या घटनेमुळे धवल आणि भावेश यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर पसरला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहे.