अखेर आघाडीत बिघाडी, भारत भालकेंच्या अडचणीत वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी। पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या पंढरपूर विधानसभा मतदार संघात अखेर राष्ट्रवादी आणि काॅग्रेस उमेदवार आमने सामने आले आहेत. काॅग्रेसचे उमेदवार शिवाजी काळुंगे यांची उमेदवारी कायम राहिल्यान राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालकेंच्या अडचणी वाढल्या आहेत. तर दुसरीकडे सांगोल्यात ही राष्ट्रवादी आणि शेकापची गेल्या अनेक दशकापासून असलेली अभ्यद्य युती या निवडणूकीत तुटली आहे. इथं शेकापचे जेष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुखाचे नातू अनिकेत  देशमुख यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे उमेदवार दीपक साळुंखे आणि शिवसेनेचे शहाजी पाटील यांच्याशी लढत होणार आहे.

पंढरपुरात महायुतीन माजी आमदार सुधाकर परिचारक यांना निवडणूकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यांच्या विरोधात मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि भाजप नेते समाधान आवताडे यांनी बंडखोरी केली आहे.

तसेच शिवसेनेच्या शैला गोडसे यांनी आपली उमेदवारी मागे घेतलीये. पंढरीच्या कुरुक्षेत्रावर आमदार भारत भालके, माजी आमदार सुधाकर परिचारक आणि बंडखोर भाजप नेते समाधान आवताडे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. येथील हायव्होलटेज लढतीकड महाराष्ट्राचे लक्ष लागल आहे.

इतर काही बातम्या-

 

Leave a Comment