औरंगाबाद – औरंगाबाद पैठण रस्त्यावरील लोहगाव फाट्याजवळ काल भरधाव आयशरने ॲपेरीक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने ॲपेरीक्षा चालक सलिम आजिज बेग (वय ५५ वर्ष, रा. कौडगाव ता. पैठण) हा जागीच ठार झाला.
याविषयी अधिक माहिती की, नेहमीप्रमाणे सकाळी आकरा वाजेदरम्यान सलिम बेग हा ॲपेरिक्षा (एम. एच. २०- टी ४२९४) ने जवळच असलेल्या आपल्या कौडगाव या गावाहुन ढोरकीनकडे प्रवासी भाडे घेऊन जात असताना, पाठीमागून भरधाव वेगाने येत असलेल्या आयशर (एम. एच. १६ – क्यु. ५७०६) ने पाठीमागून जोरदार धडक दिली. आयशर चालक वाहन घेउन पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना स्थानिक ग्रामस्थांनी त्यास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या अपघातात ॲपेरिक्षा चालक जागीच ठार झाला.
अपघाताची माहीती पैठण औद्योगिक वसाहत पोलिसांना कळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक भागवत नागरगोजे, पोलिस उपनिरीक्षक दिलिप चौरे, पोलिस, उपनिरीक्षक राहुल भदरगे, पो. हे. काँ. दिनेश दाभाडे व पो. हे. काँ. तुकाराम मारकळ यांनी घटनास्थळी धाव घेत ढोरकीन येथील आपत्कालीन सेवा विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश घोडके यांच्या मदतीने मृतास बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे व पोलीस उपनिरिक्षक दिलिप चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पैठण औद्योगिक वसाहत पोलिस करत आहे.