हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेत्री आणि राजकीय नेत्या दीपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी संबंध असून त्यांनी पाकिस्तानचे नागरिकत्वही स्वीकारले असा सनसनाटी आरोप त्यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. शिंदे यांच्या आरोपाने मोठी खळबळ उडाली आहे . अहमदनगर येथील आयोजित पत्रकार परिषदेत भाऊसाहेब शिंदे यांनी हा खळबळजनक आरोप केला आहे.
दीपाली सय्यद यांचे पाकिस्तानामध्ये एक बँक खाते आहे. यासाठी त्यांना दाऊद इब्राहिम याची पत्नी मेहजबिन कासकर हिने मदत केली असून त्यांनी दीपाली सय्यद यांना सोफिया सय्यद या नावाने पाकिस्तानी नागरित्व दिले असल्याचा पुरावा भाऊसाहेब शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. दीपाली सय्यद याचे पाकिस्तानशी असलेल्या संबंधांविषयी भाजपच्या मोठमोठ्या नेत्यांना सुद्धा माहिती आहे. परंतु आर्थिक हितसंबंधांमुळे दीपाली सय्यद यांना पाठिशी घालण्याचा प्रकार सुरु असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे.
उद्धव ठाकरेच महाविकास आघाडीचे सेनापती!! 'त्या' खास खुर्चीने वेधले लक्ष्य
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/45i2q2tGXa#Hellomaharashtra @ShivSenaUBT_ @OfficeofUT
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 3, 2023
दीपाली सय्यद यांच्याबरोबर रामदास आठवले आणि नितीन गडकरी यांचे आर्थिक संबंध आहेत. दीपाली सय्यद यांच्याविरोधात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे अनेक वेळा लेखी तक्रार देऊनही तसेच याबाबतचे पुरावे देऊनही दिपाली सय्यद कोणतीही कारवाई होत नाही असे भाऊसाहेब शिंदे यांनी म्हटलंय. शिंदे यांच्या या सनसनाटी आरोपांनी राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. यावर आता दीपाली सय्यद नेमकं काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष्य असेल