मुंबई । भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप झालेले प्रा. आनंद तेलतुंबडे यांना मुंबईतील विशेष एनआयए कोर्टानं हंगामी जामीन नाकारला आहे. मुंबईतील एनआयए विशेष कोर्टानं जामीन नाकारताना त्यांना त्यांना ८ मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत सुनावली आहे. सुप्रीम कोर्टानं तेलतुंबडे यांना तुरूंग प्रशासनासमोर शरण येण्याचे आदेश दिले होते. त्यामुळं तेलतुंबडे हे १४ एप्रिल रोजी एनआयएच्या कार्यालयात हजर झाले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.
Maharashtra: An NIA Court rejects interim bail plea of activist Anand Teltumbde, an accused in Bhima-Koregaon case and sends him to judicial custody till May 8.
— ANI (@ANI) April 25, 2020
दरम्यान, तेलतुंबडे यांनी आपले वकील आर. सत्यनारायण आणि आरिफ सिद्दीकी यांच्या मार्फत विशेष न्यायालयात हंगामी जामीनासाठी याचिका दाखल केली होती. तेलतुंबडे यांची प्रकृती चांगली नसून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना हंगामी जामीन देण्याची विनंती याचिकेद्वारे करण्यात आली होती. हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याचं सांगत एनआयएनं विरोध केला. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं तेलतुंबडे यांचा जामीन फेटाळून लावत ८ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”