सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
भीमा-कोरेगाव हिंसाचाराचे मुख्य सुत्रधार संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे हे आहेत. त्यांना अटक करून संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. भीमा-कोरेगाव हल्ला हा तत्कालीन सरकारपूरस्कृत होता पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी केला आहे. ते सांगली येथे बोलत होते. बोलतांना कवाडे म्हणाले, भीमा-कोरेगाव मुद्यापासून लक्ष विचलीत करण्यासाठी यल्गार परिषदेतील विचारवंतांना तुरूंगात डांबण्यात आले. राज्य सरकार भीमा-कोरेगाव प्रकरणी पुन्हा चौकशी करावी सत्य बाहेर येईल. संभाजी भिंडे यांना अटक करूून त्यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी कवाडे यांनी यावेळी केली.
दरम्यान, कवाडे यांनी केंद्रातील भाजप सरकारचा कारभार हे हिटलरशाही वृत्तीचा सुरू असल्याची टीका केली. भाजपच्या सत्तेत संपूर्ण देश धास्तावलेला आहे. सर्वसामान्य माणूस असुरक्षित वाटत आहे. नागरीकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नोंदणी कायदा, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी कायद्यामुळे संभ्रावस्ता निर्माण झाली आहे. मनुवादी व आरएसएस वृत्तीची माणसं केंद्रात बसल्यामुळे देशाचे वाटोळे झाले आहे. देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. अशी खरमरीत टीका कवाडे यांनी सरकारवर केली.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.
हे पण वाचा-
मिरजेत वाळू माफियांनी केलं फिल्मी स्टाईलनं तलाठ्याचं अपहरण
नागरिकत्व कायद्यामुळे महात्मा गांधींची इच्छा पूर्ण – राष्ट्रपती रामनाथ कोविंद
‘आजही गोडसे जिवंत’; जामिया गोळीबार प्रकरणी जयंत पाटील यांची प्रतिक्रिया