ग्रामपंचायत निवडणूक | काले गावात पुन्हा एकदा भीमराव दादांचा करिष्मा ; तब्बल 14-3 ने ग्रामपंचायत ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | कराड तालुक्यातील सर्वात महत्वाची ग्रामपंचायत असलेल्या काले या गावात पुन्हा एकदा जेष्ठ नेते भीमराव दादा पाटील यांचे वर्चस्व दिसून आले. भीमराव दादा पाटील गटाच्या व्यंकनाथ ग्रामविकास पॅनल ने तब्बल 14 – 3 असा दणदणीत विजय मिळवून काल्यात पुन्हा एकदा सत्ता स्थापन केली आहे. काले गावात विरोधकांना केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

भीमराव दादा पाटील यांचे सुपुत्र दयानंद पाटील भाऊ पुन्हा एकदा कालेकरांच्या मनातील हिरो ठरले. दयाभाऊ यांनी काल्यात केलेली विविध प्रकारची विकासकामे आणि लोकांच्या मदतीला धावून जाण्याची वृत्ती यामुळे लोकांना ते नेहमीच आपले वाटतात. या विजयामुळे काले गावात उत्साहाचे वातावरण असून जल्लोष साजरा केला जात आहे.

दरम्यान यावेळी दयानंद पाटील यांनी सर्व मतदारांचे आभार मानले. तसेच निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे आभार मानले. गावाच्या विकासासाठी सदैव तत्पर आहे असं आश्वासन देखील त्यांनी दिले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’