धक्कादायक! पत्नी आणि सासूच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

sucide
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात सध्या अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशीच एक नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये पत्नी आणि सासूच्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने एक व्हिडिओ शूट करून अनेक गंभीर आरोप केले आहेत. सासरच्या मंडळींनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं असं म्हणत तरुणाने विष घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने एक व्हिडीओ आणि सुसाईड नोट देखील लिहीली होती. या 28 वर्षीय तरुणाचे नाव यशपाल असे आहे. त्याचे 2018 रोजी सोनीपत जिल्ह्यातील एका मुलीशी लग्न झालं होतं.

लग्नानंतर पती-पत्नीत सातत्याने खटके उडत असत. त्यांच्यात विविध कारणांमुळे वाद होत होते. शनिवारी यशपालची पत्नी आणि तिच्या माहेरच्या मंडळींनी त्याच्यासोबत खूप मोठं भांडण केलं. ज्यामुळे पोलीस देखील त्यांच्या घरी आले होते. पोलिसांनी दोघांना समजावले. पण सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून यशपालने आत्महत्येचा निर्णय घेतला. यशपालच्या आत्महत्येची माहिती मिळताच त्याच्या घरच्यांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. यशपालला एक अडीच वर्षांची मुलगी देखील आहे.

मृत्यूसाठी पत्नी, सासू आणि काही नातेवाईक जबाबदार
यशपालने आत्महत्येपूर्वी आपल्या मोबाईलमध्ये एक व्हिडीओ तयार केला होता. या व्हिडिओमध्ये त्याने आपल्या मृत्यूसाठी आपली पत्नी, सासू आणि काही नातेवाईकांना जबाबदार धरलं आहे. तसेच आपल्या मृत्यूनंतर मुलीचा ताबा आपल्या कुटुंबीयांना द्या असा सल्ला देखील त्याने दिला आहे. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली आहे. यशपालच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या पत्नी आणि सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.