मुलगी झाल्याच्या आनंदात भाजपा कार्यकर्त्याने फ्री मध्ये वाटली तब्बल 1 लाख पाणी पुरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मध्य प्रदेश : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशमधील एका भाजपा कार्यकर्त्याने मुलीच्या जन्माचा आनंद हा अत्यंत अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. त्याने आपल्या घरी मुलीचा जन्म झाल्याच्या आनंदात तब्बल एक लाख पाणीपुरीचं (panipuri) मोफत वाटप केले आहे. त्याच्या या अनोख्या सेलिब्रेशनची सोशल मीडियाची जोरदार चर्चा सुरु आहे. अंचल गुप्ता असे या भाजपा कार्यकर्त्याचे नाव आहे. गुप्ता यांनी मुलगी झाल्याच्या आनंदात तब्बल एक लाख पाणीपुरी (panipuri) लोकांना मोफत वाटली आहे.

भोपाळमध्ये राहाणारे अंचल गुप्ता हे भाजपाचे कार्यकर्ते असून त्यांचे मुखर्जी नगरात गुप्ता चाट भंडार नावाचे दुकान आहे. अंचल यांनी मुलीचे नाव अनोखी असे ठेवले असून त्यांनी तिचा जन्म दिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. गुप्ता यांनी मुलीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त एका बर्थ डे पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीतच गुप्ता यांनी पाणीपुरीचा (panipuri) एक स्टॉल लावला होता. गुप्ता यांनी या स्टॉलवर स्वत: लोकांना पाणीपुरी खायला दिली.

रामेश्वर शर्मा नावाच्या एका व्यक्तीने अंचल यांच्या या अनोख्या पाणीपुरी (panipuri) सेलिब्रेशनचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी हा व्हिडीओ रिट्विट करत अनोखीला वाढ दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नेहमी आनंदी, सुखी राहा असं म्हणत चौहान यांनी अनोखीला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

हे पण वाचा :
DJ च्या गाडीवर अचानक पसरला करंट; नाचता नाचता तरुणांची झाली भयंकर अवस्था
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मोठा अपघात; शिवशाही बस पलटी होऊन खड्ड्यात
Jasprit Bumrah आशिया चषक स्पर्धेला मुकणार ? समोर आलं ‘हे’ मोठं कारण
सपाच्या जिल्हा अध्यक्षांच्या गाडीला अपघात थोडक्यात बचावले, थरारक Video आला समोर
भाजप प्रदेशाध्यक्षपदी आशिष शेलारांच्या नावाची चर्चा?? तर चंद्रकांत पाटलांना…