भोपाळ । भोपाळच्या भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करुन नवा वाद निर्माण करत असतात. एकदा पुन्हा त्या आपल्या विधानावरून चर्चेत आल्या आहेत. भोपाळमधील व्यापाऱ्यांवर त्यांना भरसभेत चांगल्याच भडकल्याचं पाहायला मिळालं आहे. “तुम्ही मतं देऊन नेत्यांना विकत घेत नाही” अशा शब्दांमध्ये प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी व्यापाऱ्यांना दटावत आपला संताप व्यक्त केला आहे. तसेच विकास कामं करणं हे लोकप्रतिनिधींच काम असलं तरी तुम्ही सुद्धा यासंदर्भात जागृक राहणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.
प्रज्ञा सिंह ठाकूर या भोपाळमधील न्यू मार्केट परिसरामधील एका इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित होत्या. यावेळी मंचावर गेल्यानंतर ठाकूर यांनी कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या व्यापाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. “तुम्ही लोकं आम्हाला मतदान करुन विकत घेत नाही हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. विकास कामं करणं हे लोकप्रतिनिधींचं काम आहे. तुम्हीही यासंदर्भात जागृक राहण्याची गरज आहे. मात्र असं होताना दिसत नाही. तुम्ही जागृत नसल्यानेच भू-माफियांची दहशत वाढली आहे. तुम्ही जागृक नसल्याने विकासकाम होतं नाहीत” असं म्हटलं आहे.
व्यापाऱ्यांना सल्ला देताना प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी तुम्ही जागृक राहणं गरजेचं आहे असं देखील म्हटलं आहे. अशाप्रकारे प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी व्यापाऱ्यांना थेट सभेमध्ये सुनावण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी अशाप्रकारे भरसभेमध्ये अनेकदा व्यापाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. ठाकूर या त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’