राष्ट्राचे नेतृत्व करण्याची संपूर्ण क्षमता सध्या कोणामध्ये असेल तर ती शरद पवार साहेबांमध्येच – संजय राऊत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या शेतकरी आंदोलनामुळे देशभरात राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच दिल्ली मध्ये अनेक राजकीय घडामोडी होऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची युपीएच्या अध्यक्षपदी निवड होण्याचं वृत्त सगळीकडे पसरलं आहे. विरोधी पक्षांची सूत्रे शरद पवार यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता युपीएमधील काही नेत्यांनी वर्तवली आहे. तसे झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात भक्कम पर्याय म्हणून शरद पवार यांना एकमताने पंतप्रधानपदाच्या दाव्यासाठी समोर आणलं जाईल अशी शक्यता काही काँग्रेस नेत्यांच्या मागणीमुळे निर्माण झाली आहे.

दरम्यान, हे वृत्त पसरताच राज्यातील विविध नेते यावर प्रतिक्रिया देत आहेत. महाराष्ट्रात भाजपला चकवा देत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यात शरद पवार यांच्यासोबतच महत्वाचा वाटा असलेले शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी देखील या विषयावर भाष्य केलं आहे.

‘राष्ट्राचे नेतृत्व करण्याची संपूर्ण क्षमता सध्या कोणामध्ये असेल तर ती शरद पवार साहेबांमध्ये आहे.’ असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. यासोबतच, ‘भविष्यात राष्ट्रीय राजकारणात काय होईल हे मी सांगू शकत नाही. मात्र, देशभरातील विरोधकांची इच्छा आहे महाराष्ट्रातील प्रयोग भविष्यात देशपातळीवर करावे’ असं सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment