Bhor-Mahad road : भोर – महाड रस्ता दोन महिने राहणार बंद ; एस. टी. च्या 11 फेऱ्या रद्द

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Bhor-Mahad road : राज्यभरात रस्त्याच्या दुरुस्ती आणि विस्तारीकरणाची अनेक कामे हाती घेतली जात आहेत. अशातच आता भोर वरंधा घाटातील भोर – महाड रस्त्याच्या दुरुस्तीचे काम देखील हाती घेण्यात आले असल्यामुळे या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक (Bhor-Mahad road) बंद करण्यात आली असून या मार्गावरील राज्य परिवहन महामंडळाची एस. टी. बस वाहतूक देखील बंद करण्यात आली आहे.

शिवाय रस्ता बंद असल्याच्या कारणाने या मार्गावरच्या भोर, पुणे डेपो व इतर डेपोंच्या दररोजच्या ११ फेऱ्या आता रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे. या मार्गावरून कोकणात एस टी ने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. शिवाय मालवाहतूक आणि इतर प्रवासी वाहनांची सुद्धा या मार्गावर वर्दळ असते. गावखेड्यात सेवा (Bhor-Mahad road) देणाऱ्या एस टी च्या ११ फेऱ्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होणार आहे. त्यामुळे यावर पर्यायी मार्ग काढण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

दोन महिने रस्ता बंद (Bhor-Mahad road)

भोर तालुक्यातून कोकणात जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ डीडी वरंधा (ता. महाड, जि. रायगड) रायगड जिल्हा हद्द हा वरंध घाटातील रस्ता दुरुस्तीसाठी १ एप्रिल ते ३० में असा दोन महिने सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद (Bhor-Mahad road) ठेवण्यची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे वरंधा घाट पुढील दोन महिने बंद राहण्याची शक्यता आहे.

या ११ गाड्या रद्द

यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडाळाने भोर-महाड रस्त्याने कोकणात जाणाऱ्या भोर डेपोची भोर-महाड बस, पुणे डेपोची पिंपरी चिंचवड ते खेड, पिंपरी चिंचवड ते अहिरेवाडी, पिंपरी चिंचवड ते माखजन, पिंपरी चिंचवड ते दापोली, पुणे ते महाड, जळगाव ते महाड, आंबेजोगाई ते खेड, पोलादपूर ते पुणे, महाड ते पुणे या सर्व ११ गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे कोकणात जाणाऱ्या पर्यटकांचे हाल (Bhor-Mahad road) होणार आहेत.