Bibi Ka Maqbara Sambhaji Nagar | ऐतिहासिक वारसा असलेला महाराष्ट्रातील ताजमहाल तुम्ही पाहिलाय का? देश- विदेशातील लोक देखील करतात गर्दी

Bibi Ka Maqbara Sambhaji Nagar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्राला ऐतिहासिक तसेच सामाजिक वारसा लाभलेला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक ठिकाणाला काहीतरी महत्त्व आणि इतिहास आहे. त्यानुसारच महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांची नावे ठेवली गेलेली आहेत. महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळी सांस्कृतिक माहिती देणारी अशी स्थळे आहे. यातीलच एक मोठे ठिकाण म्हणजे छत्रपती संभाजीनगर अर्थातच औरंगाबाद हे महाराष्ट्राचे (Bibi Ka Maqbara Sambhaji Nagar ) पर्यटन राजधानी म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी वेगवेगळी पर्यटन स्थळे आहेत. जी पाहण्यासाठी देश विदेशातून देखील लोक येतात. छत्रपती संभाजीनगर येथे पानचक्की, मुघल कालीन दरबारी, सोनेरी महल, वेरूळ अजिंठा लेणी, बुद्ध लेणी अशा विविध गोष्टी आहेत. ज्यांना ऐतिहासिक आणि पारंपारिक वारसा लाभलेला आहे.

छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाची ओळख ही महाराष्ट्राची पर्यटन राजधानी अशी आहे. या ठिकाणी अनेक पर्यटन स्थळ आहेत. जी खूप प्रसिद्ध देखील आहेत. औरंगाबादपासून केवळ 15 किलोमीटर अंतरावर वेरूळजवळ दौलताबाद हा किल्ला आहे. या किल्ल्याला मोठी ऐतिहासिक कहानी जोडलेली आहे. हा किल्ला पाहण्यासाठी त्याचप्रमाणे तिथली ऐतिहासिक माहिती समजून घेण्यासाठी अनेक लोक या किल्ल्याला भेट देत असतात.

औरंगाबादमध्ये अजिंठा लेणी खूप प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे वेरूळची लेण्याही या ठिकाणी खूप प्रसिद्ध आहे. 1951 साली भारत सरकारने वेरूळ लेणी येथे राष्ट्रीय स्मारक घोषित केले. या वेरूळ लेण्यांमध्ये हिंदू, जैन, बुद्ध अशा धर्मांचे शिल्प कोरलेले आहेत. विविध धर्मांचे शिल्प कोरलेली ही देशातील एकमेव लेणी आहे. त्यामुळे या ठिकाणी भेट देण्यासाठी देखील खूप गर्दी असते.

अजिंठा लेणी हे औरंगाबादचे मुख्य आकर्षण आहे. कारण अजिंठा लेण्या या भगवान गौतम बुद्धाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतची कथा सांगतात. या ठिकाणी आपल्याला जाऊन संपूर्ण इतिहास पाहायला मिळतो. त्यामुळे अजिंठा लेणीला अनेक लोक आवर्जून भेट देतात. येथील सोनेरी महल हा एक ऐतिहासिक राजवाडा म्हणून प्रसिद्ध आहे. हा बुंदेलखंडाच्या सरदारने बांधलेला होता. औरंगाबादच्या पहारा सिंगपुरा परिसर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात हा सोनेरी महल देखील आहे.

औरंगाबादला 52 दरवाजाचे शहर असे देखील म्हटले जाते. या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळी पर्यटन स्थळ आहेत. ज्यामुळे आपल्याला आपला इतिहास समजतो. त्यामुळे या जिल्ह्याला पर्यटन जिल्हा असे देखील घोषित करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी असलेला बीबी का मकबरा हा महाराष्ट्राचा ताजमहाल म्हणून देखील ओळखला जातो. या बीबी का मकबराची (Bibi Ka Maqbara Sambhaji Nagar ) रचना ही दिल्लीतील राज महल प्रमाणेच आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक लोक हे आवर्जून या ठिकाणी भेट देतात.