चौकोनी चाके असलेली सायकल; Video पाहून तोंडात बोटं घालाल

Bicycle with square wheels
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मित्रानो, सायकल (Bicycle) म्हंटल कि आपल्या डोळ्यासमोर येतात तिची २ गोलाकार चाके, हॅन्डल आणि पँडल… जगात अनेक प्रकारच्या स्पोर्टी सायकली आल्या परंतु त्यामध्ये या ३ गोष्टी पाहायला मिळाल्या. परंतु आता चक्क चौकोनी आकाराची चाके असलेली सायकल (Bicycle With Square Wheels) सुद्धा आली आहे. होय, ऐकायला आणि वाचायला थोडं विचित्र वाटत असलं तरी हे खरं आहे. आता तूम्हांला प्रश्न पडला असेल की चौकोनी चाके असलेली सायकल चालते तरी कशी ? तर चला आज याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊया….

ही अनोखी सायकल द क्यू नावाच्या कंपनीच्या वैज्ञानिकांनी बनवली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे चौकोनी चाके असूनही ही सायकल रस्त्यावर आरामात पुढे पुढे सरकत आहे. ही सायकलची चाके मिलिट्री टैंक प्रमाणे काम करत आहेत म्हणजेच या चौकोनी चाकांवर लोखंडी साखळीचा सेट लावण्यात आलाय त्यावर एक रबरी पट्टा लावला जातो आणि हा पट्टा या रीडभोवती फिरतो. ज्यामुळे ही सायकल पुढे पुढे सरकत जाते. सोशल मीडियावर या अजब सायकलीचा विडिओ जोरदार व्हायरल झाला आहे.

सध्याच्या या टेक्नॉलॉजीच्या जगात आपण अनेक वेगवेगळे चमत्कार पाहिले आहेत. परंतु चौकोनी चाके असलेली सायकल बाजारात येईल याचा विचारही कोणाच्या मनात आला नसेल. त्यामुळे ही अनोखी सायकल पाहून प्रत्येकजण हैराण झाला आहे. अशी सायकल बनवण्याची गरज काय होती, असा विचारही काही लोक करत आहेत. परंतु सध्या तरी ही चौकोनी चाके असलेल्या सायकलीने संपूर्ण जगाचे लक्ष्य वेधून घेतले आहे.