महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प सादर!! सरकारकडून राज्यातील महिलांसाठी मोठया घोषणा

0
1
Interim Budget
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज म्हणजेच शुक्रवारी शिंदे सरकारने राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पाला विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडले. आज सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये सरकारने राज्यातील महिलांसाठी मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. या घोषणेमध्ये महिलांना दरमहा 1200 ते 1500 रुपये, बेरोजगारांना दरमहा 5 हजार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी 33 कोटी रुपयांचा प्रस्ताव अजित पवारांकडून मांडण्यात आला आहे.

  • आजच्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करण्यात आले आहे. तसेच योजनेअंतर्गत २१ ते ६० वर्षाच्या महिलांना दरमहा १५०० दिले जाणार आहेत. याकरिता ४६००० कोटी रुपये खर्च येईल. अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे.
  • राज्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना देखील जाहीर करण्यात आली आहे. यासह विवाहित महिलांसाठी शुभमंगल योजनेचा निधी वाढवण्यात आला आहे. तसेच, प्रत्येक कुटुंबाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात आले आहेत. अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे.
  • राज्यातील महिलांना 10 हजार पिंक रिक्षा देण्यात येणार, अशी घोषणा देखील सरकारने केली आहे.
  • व्यावसायिक शिक्षणासाठी महिलांना आठ लाख रुपये उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना फ्री मध्ये शंभर टक्के सूट देणार अशी ही घोषणा सरकारने केली आहे.
  • प्रत्येक कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलिंडर मोफत मिळणार..