Big Boss मधील ‘या’ मोठ्या कलाकाराला कोरोनाची लागण; स्वतः व्हिडिओ शेयर करून दिली माहिती

0
50
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । बिग बॉस फेम अनिल थत्ते यांना कोरोनाची लागण झाली आहे. थत्ते यांनी स्वतः एक व्हिडिओ शेयर करून याबाबत माहिती दिली आहे. आपल्याला कोरोना झाला असून आपण सध्या रुग्णालयात दाखल झालो आहोत असे थत्ते यांनी सांगितले आहे.

कोरोना व्हायला नको म्हणून मी खूप काळजी घेतली. परंतु इतकी काळजी घेऊनही मला कोरोनाची लागण झाली. आता त्यामुळे कोरोनाची भीती मेली आहे असे मत थत्ते यांनी यावेळी व्यक्त केलं. कोरोना झाला हे बरे झाले. आता त्यामुळे कोरोनाची भीती तरी गेली असंही ते म्हणालेत.

दरम्यान, देशात अनलॉक-१ सुरू आहे. देशातील विविध राज्यांमध्ये लॉकडाउनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. दरम्यान भारतात सध्या २,२७,४३९. करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहे. देशातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६,२५,५४४ वर पोहचलीय. यातील १८,२१३ जणांचा मृत्यू झालाय तर ३,७९,८९२ रुग्णांनी या आजारावर मात केलीय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here