पोलीस दलात मोठे फेरबदल ! निमीत गोयल औरंगाबादचे नवीन पोलीस अधिक्षक

Police
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – पोलीस दलात मोठे फेरबदल झाले असून औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांची लोहमार्ग पोलिस अधीक्षक औरंगाबाद या ठिकाणी बदली झाली आहे. तर त्यांच्या जागी मुंबई शहर पोलीस उपायुक्त आयपीएस अधिकारी निमीत गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य शासनाने आयपीएस उपायुक्त उपअधीक्षक सहायक पोलिस आयुक्त या पदांवरील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी सायंकाळी काढले. आयपीएस अधिकार्‍यांमध्ये ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांची औरंगाबाद येथील लोहमार्ग पोलिस अधीक्षक पदी बदली केली आहे. त्यांच्या जागी मुंबई शहर पोलीस दलात उपायुक्त निमीत गोयल यांची पदस्थापना करण्यात आली आहे. निमीत गोयल हे 2008 च्या बॅचचे अधिकारी असून त्यांनी सिंधुदुर्ग येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून कार्य केले आहे.

या शिवाय शहर पोलिस आयुक्तालयातील उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील आणि मीना मकवाना यांचीही बदली झाली आहे.