हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मे महिना अवघ्या २ दिवसात संपणार असून लवकरच जून महिना सुरु होईल. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी देशात आर्थिक बदल होत असतात. त्यानुसार, जून महिन्यात सुद्धा काही आर्थिक गोष्टींमध्ये आणि वस्तूंच्या किमतींमध्ये बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिक गाड्यांपासून ते एलपीजी गॅस पर्यंत अनेक गोष्टीत बदल पाहायला मिळू शकतात. तत्पूर्वी, जून महिना सुरू होण्यापूर्वी जाणून घेऊया नेमके कोणते बदल अपेक्षित आहेत आणि सर्वसामान्य जनतेवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो .
१) CNG- PNG रेट –
एलपीजी सिलिंडरप्रमाणेच CNG- PNG च्या किमतीही दर महिन्याच्या पहिल्या दिवशी बदलतात. पेट्रोलियम कंपन्या दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये सीएनजी-पीएनजीच्या किमती बदलतात. यापूर्वी एप्रिलमध्ये दिल्ली आणि मुंबईमध्ये सीएनजी- पीएनजीचे दर कमी करण्यात आली होती. परंतु पहिल्या मे रोजी फारसा बदल झाला नाही. अशा स्थितीत सर्वसामान्यांच्या नजरा एका तारखेकडे लागल्या असून सीएनजी-पीएनजीच्या दरात बदल होण्याची अपेक्षा आहे.
२) इलेक्टिक गाड्या महागणार –
१ जूनपासून इलेक्ट्रिक टू व्हिलर महाग होण्याची शक्यता आहेत. उद्योग मंत्रालयाने अनुदानाची रक्कम सुधारित करून 10,000 रुपये प्रति किलोवॅट प्रति तास केली आहे, तर पूर्वी ही रक्कम 15,000 रुपये प्रति केडब्ल्यूएच होती. यामुळे, बहुतेक इलेक्ट्रिक टू व्हिलर सुमारे 25,000 ते 35,000 रुपयांनी महाग होऊ शकतात.
३) बचत आणि चालू खात्यात मोठा बदल-
1 जूनपासून, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशातील बँकांमध्ये जमा केलेल्या अनक्लेम्ड रकमेचा निपटारा करण्यासाठी मोहीम सुरू करणार आहे. या मोहिमेचे नाव ‘100 दिवस 100 पेमेंट्स’ असे ठेवण्यात आले आहे. हे. या मोहिमेअंतर्गत अशी बचत आणि चालू खाती जी 10 वर्षांपासून चालवली जात नाहीत आणि त्यामध्ये शिल्लक आहे किंवा मॅच्युरिटीच्या तारखेपासून 10 वर्षांच्या आत कोणीही दावा केलेला नाही, त्यांना अनक्लेम्ड डिपॉजिट मानल्या जातील.
४) गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल होऊ शकतो –
सरकारीतेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी LPG च्या किमती बदलतात. LPG गॅसच्या किमती दर महिन्याच्या एका तारखेला निश्चित केल्या जातात. यापूर्वी आपल्याला एप्रिल आणि मेच्या पहिल्या तारखेला १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घट झालेली पाहायला मिळाली होती. मात्र 14 किलो एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नव्हता . आता या महिन्यात गॅसच्या किमतीत काय बदल होतो याकडे सर्वसामान्य माणूस लक्ष्य ठेऊन आहे.