हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कंझ्युमर रिटेल कंपनी असलेल्या विजय सेल्सकडून Year End Sale ची घोषणा करण्यात आली आहे. त्याअंतर्गत लॅपटॉप, स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांवर जबरदस्त ऑफर्स दिली जात आहे.
विजय सेल्सच्या या Year End Sale मध्ये सॅमसंग A13 हा स्मार्टफोन ग्राहकांसाठी 14,499 रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याच वेळी, Sansui 70-इंच 4K Android LED TV 59,990 रुपयांमध्ये, Lenovo IdeaPad 1 लॅपटॉप 36,100 रुपयांमध्ये, LG 8kg 5-स्टार वॉशिंग मशीन 23,600 रुपयांमध्ये उपलब्ध असेल. याबरोबरच या सेलमध्ये गेमिंग लॅपटॉपवर 45 टक्के तर टॅब्लेटवर 47 टक्के सूट देण्यात येते आहे.
याशिवाय, या Year End Sale मध्ये ग्राहकांना गिझर आणि स्टीमरवर 46 टक्के आणि लोखंडी, कपड्याच्या स्टीमरवर 50 टक्क्यांपर्यंतची सूट मिळू शकेल. इतकेच नाही तर या सेलमध्ये चिमणी, कूक-टॉप, किटली, कॉफी मेकर, सँडविच मेकर आणि टोस्टरवरही 50 टक्क्यांपर्यंतची सूट दिली जाते आहे. याबरोबरच ग्राहकांना 1,499 रुपयांपासून सुरू होणाऱ्या स्मार्टवॉचवरही मोठी सवलत मिळू शकेल. याव्यतिरिक्त, MyVS रिवॉर्ड्स लॉयल्टी प्रोग्रॅमद्वारेही ग्राहकांना अतिरिक्त फायदे मिळतील.
याव्यतिरिक्त, विजय सेल्स स्टोअर्स आणि http://www.vijaysales.com वरही ग्राहकांना देशातील टॉप बँकांकडून सवलत मिळवता येईल. एचडीएफसी बँकेच्या कार्डधारकांना 15000 रुपयांवरील ट्रान्सझॅक्शनवर 3000 रुपयांपर्यंतचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. याव्यतिरिक्त, ग्राहकांना 1500 रुपयांवरील क्रेडिट कार्ड नॉन-ईएमआय ट्रान्सझॅक्शनवर 5% सूट मिळू शकेल. Year End Sale
याशिवाय, ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डधारकांना 1,00,000 रुपये आणि त्याहून जास्तीच्या खरेदीसाठीच्या EMI ट्रान्सझॅक्शनवर 5000 रुपयांपर्यंतचा फ्लॅट डिस्काउंट देखील मिळू शकेल. तर HSBC क्रेडिट कार्ड कार्डधारकांना 7500 रुपयांपर्यंतचा इन्स्टंट डिस्काउंट मिळू शकेल. Year End Sale
हे पण वाचा :
Jan Dhan Account उघडताच मिळतो 10 हजारांचा लाभ, कसे ते जाणून घ्या
Bank Account शी मोबाईल नंबर लिंक करणे महत्त्वाचे का आहे??? जाणून घ्या त्यासाठीची प्रक्रिया
Bandhan Bank च्या ‘या’ FD वर आता मिळणार 8% पेक्षा जास्त व्याज
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे नवीन दर तपासा
Samsung Galaxy F04 : सॅमसंग भारतात लॉन्च करणार 8,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा स्मार्टफोन